...म्हणून फडणविसांनी ठरवलेला ‘करेक्ट’ कार्यक्रम शक्य नाही

वास्तविक सरकार पडणे किंवा पाडणे शक्य नाही याची कल्पना फडणवीस आणि त्यांच्या नेत्यांना आली आहे.
...म्हणून फडणविसांनी ठरवलेला ‘करेक्ट’ कार्यक्रम शक्य नाही
prithviraj 2.jpg

पुणे : राज्य सरकारचा‘करेक्ट’ कार्यक्रम करतो असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राज्यातील मतदारांना सांगत असले तरी राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश किंवा अन्य राज्यांप्रमाणे इतर पक्षातील आमदारांना राजीनामा द्यायला लावून पुन्हा निवडणून आणण्याचे प्रयोग तसेच अन्य कोणताही मार्ग अवलंबून राज्य सरकार पाडणे भारतीय जनता पार्टीला शक्य होणार नाही. त्यामुळे फडणवीस यांना कितीही वाटत असले तरी त्यांच्या मनातला ‘करेक्ट’ कार्यक्रम राज्यात शक्य नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितले. (... so the 'correct' program decided by Fadnavis is not possible)

‘सरकारनामा’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना चव्हाण यांनी या संदर्भात विस्तृत विश्‍लेषण केले. ते म्हणाले, ‘‘ शिवसेना, कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांपैकी कोणत्याही पक्षाचे दोन तृतियांश आमदार फोडणे आणि पुन्हा त्यांना निवडून आणणे या दोन्ही गोष्टी केवळ अशक्य आहेत. मध्यप्रदेश किंवा कर्नाटकात भाजपाला बहुमतासाठी लागणारा आकडा १५ ते २० या दरम्यान होता. राज्यात भाजपाला लागणारा आकडा मोठा आहे. एक वेळ दोन तृतियांश आमदार फोडले असे गृहीत धरले तरी तीन पक्षांच्या आघाडीच्या विरोधात भाजपाचा आमदार पुन्हा निवडून येणे कदापी शक्य नाही.’’


दुसरी शक्यता म्हणजे आघाडीतील तीनपैकी एका पक्ष भाजपासोबत जाऊन सरकार बनविणे. ही शक्यता तर विद्यमान राजकीय स्थितीत कदापी शक्य नाही.त्यामुळे हे सरकार पाडून सरकार बनविण्याची कोणतीही शक्यता सध्याच्या परिस्थितीत भाजपाला शक्य नाही.या सरकारसोबत सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये मतभेद होतात का आणि त्यातून हे सरकार पडेल याची वाट पाहण्यापलिकडे फडणवीस आणि भाजपाकडे सध्यातरी कोणताही पर्याय नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

वास्तविक सरकार पडणे किंवा पाडणे शक्य नाही याची कल्पना फडणवीस आणि त्यांच्या नेत्यांना आली आहे. मात्र, सध्या सोबत असलेल्या आमदारांनी इतर पक्षात जाण्याचे मार्ग शोधू नयेत यासाठी फडणवीस प्रयत्न करीत आहेत.आमदारांचे मनोधैर्य कायम ठेवण्यासाठी ‘करेक्ट’ कार्यक्रमाच्या गप्पा मारण्याशिवाय फडणवीस यांना दुसरा पर्याय नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.     

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in