Pune : औषधांच्या नावाखाली विदेशी दारुची तस्करी; ६६ लाखांची गोवा बनावटीची दारू पकडली

Pimpri-Chinchwad : कंटेनरमधून विदेशी दारूची तस्करी, ६६ लाखांचा साठा सोमाटणे टोलनाक्यावर पकडला
Pimpri-Chinchwad
Pimpri-ChinchwadSarkarnama

पिंपरी : औषधांच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीचा डाव राज्य उत्पादन शुल्कच्या (STATE EXCISE) तळेगाव दाभाडे (ता.मावळ,जि.पुणे) विभागाने हाणून पाडला.

त्यांनी गोव्याहून कंटेनर भरून आलेला ६६ लाख रुपयांच्या विदेशी दारूचा साठा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (PUNE-MUMBAI EXPRESS WAY) शनिवारी पकडला.

या गोवा निर्मित व तेथेच विकण्याची परवानगी असलेल्या विदेशी दारू आणि बिअरच्या तस्करीप्रकरणी कंटेनरचालक शंकरलाल नारायण जोशी (वय ४६, रा.राज्यस्थान) याला पकडण्यात आले आहे. तर, त्याचा साथीदार ओमपुरी हा फरार झाला असल्याची माहिती तळेगाव दाभाडे उत्पादन शुल्क विभाग कार्यालयातून आज देण्यात आली.

Pimpri-Chinchwad
Kasba Peth : फडणवीसांनी कसब्याच्या पराभवाचं पोस्टमार्टेम केलं; आता रिपोर्टचा फटका कुणाला बसणार?

कर्नाटकातील बेंगलोरहून ही दारू सीलबंद कंटेनरमधून नगरला नेण्यात येत होती. मात्र, कंटेनरमध्ये औषधे असल्याची कागदपत्रे (इनव्हाईस) बनिवण्यात आली होती. पर्यटन राज्य असलेल्या गोव्यात दारूनिर्मिती आणि विक्रीवर कर अत्यल्प असल्याने तेथे ती खूप स्वस्त मिळते. म्हणून तिची इतर राज्यात मोठ्या प्रमाणावर कर चुकवून वाहतूक केली जाते.

तशीच ती महाराष्ट्रातही आणली जाते आणि इथेच ती बनली असल्याचे लेबल त्यावर लावून ती इथे गोव्यापेक्षा अवाच्या सव्वा भावाने विकून भरमसाठ फायदा कमावला जातो, असे गोवा निर्मित दारू तस्करीमागील गणित राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याने `सरकारनामा`ला सांगितले.

सीलपॅक कंटेनरमध्ये सहसा कस्टमचा माल असतो, म्हणून त्याची तपासणी न करता तो सोडला जातो. म्हणून गोवा दारूच्या तस्करीत त्याचा वापर होत आहे, असे हा अधिकारी म्हणाला.

Pimpri-Chinchwad
Sheetal Mhatre : व्हिडिओ व्हायरल प्रकरणाचा मास्टर माईंड कोण? शीतल म्हात्रेंनी स्पष्टच सांगितलं

कालची कारवाई मिळालेल्या गुप्त माहितीवरून सोमाटणे टोलनाक्याजवळील हॉटेल सॉमटनसमोर करण्यात आली. तर गोवा बनावटीची विदेशी दारू आणि बिअरचे ८४५ बॉक्स तमिळनाडूत नोंद दहाचाकी कंटेरनमधून (टीएन-६९-बीबी- २५२३) हस्तगत करण्यात आले. ६६ लाखांची दारू आणि कंटेनर असा ८६ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क निरीक्षक संजय सराफ, दुय्यम निरीक्षक दिपक सुपे, प्रियंका राठोड, सागर धुर्वे, आर.सी.लोखंडे तसेच जवान तात्याबा शिंदे, राहूल जौंजाळ, संजय गोरे या पथकाने ही कारवाई केली. तस्करीच्या या दारुची वाहूतक करणाऱ्या कंटेनरचा चालक हा राज्यस्थानचा आहे.

Pimpri-Chinchwad
Eknath Khadse : खडसेंचा दणका; विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करताच अन्न व औषध प्रशासन अॅक्शन मोडवर

यापूर्वी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वरच ऊर्से टोलनाक्यावर दीड महिन्यापूर्वी या विभागाने गोवा दारूच्या तस्करीत पकडलेल्या कंटेनरचा चालक हा राज्यस्थानचा, तर चालक हा गुजरातचा होता.

२७ जानेवारीला त्यांनी ६३ लाखांची गोवा बनावटीची चोरटी कंटेनरभर दारू पकडली होती. तर, त्याअगोदर याच विभागाने तळेगावच्या हद्दीत ८८ लाख रुपयांची गोवा दारूची तस्करी उजेडात आणली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com