सिंधुताईंची 'ती' इच्छा मुख्यमंत्री पुर्ण करणार

मुख्यमंत्र्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची दखल घेतली आहे. याबाबतच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाला दिल्या आहेत.
Uddhav Thackeray, Sindhutai Sapkal
Uddhav Thackeray, Sindhutai Sapkalsarkarnama

पुणे : अनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि ‘अनाथांची माय’ या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा भाषणाची एक जुनी क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी खंत व्यक्त केली होती.

ती क्लिप व सिंधुताई सपकाळ यांची खंत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी मुंबई येथील शिक्षक उदय नरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवली आहे. मुख्यमंत्र्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची दखल घेतली आहे. याबाबतच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाला दिल्या आहेत. याबाबतचे एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शालेय शिक्षण विभागांच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठवले आहे.  

सिंधुताईंचे पुस्तक कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात लावण्यात आलेले आहे, मात्र, महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही, ही खंत एका व्हिडिओमध्ये सिंधुताईंनी व्यक्त केली होती व ती क्लिप आता सर्वत्र वायरल होत आहे.

Uddhav Thackeray, Sindhutai Sapkal
ममतांना गोव्यात सत्तेचं स्वप्न पडतंय, त्यांच्या प्रतिमेस शोभणारं नाही ; राऊतांनी सुनावलं

या क्लिपमध्ये सिंधुताईंनी खंत व्यक्त केली आहे. ''महाराष्ट्रात मोठ व्हायचं असेल तर त्यासाठी मरावं लागतं आणि मेलेला माणूसच मोठ होतं अशी शोकांतिका आपल्या राज्याची आहे असं मत या व्हिडिओमध्ये आहे. मेल्यानंतर जिथे माणसं मोठी होतात तो महाराष्ट्र आहे हे दु:ख आहे,'' अशी खंत त्यांनी या व्हिडिओमध्ये व्यक्त केली आहे.

''सिंधुताईंची अखेरची इच्छा शिक्षण विभागाने आता पूर्ण करावी,'' असा सूर आज शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी लक्ष घालून सर्वसामान्यांची इच्छा पुर्ण करावी,'' असा संदेश सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in