भोंग्यांविरोधात जनजागृतीसाठी पुणे मनसेची उद्यापासून स्वाक्षरी मोहीम

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भूमिका घेतल्यापासून मनसे या विषयावर आक्रमक आहे.
MNS Pune
MNS PuneSarkarnama

पुणे : मशिदीवरील भोंगे हटविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (Maharashtra Navnirman Sena) उद्यापासून पुणे शहरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. भोंगे हटविण्यामागची इतर धर्मियांची भूमिका स्पष्ट व्हावी, यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष (Sainath Babar) यांनी सांगितले.

MNS Pune
राज्य सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; मराठा मुलांच्या सवलती थांबवल्या

राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्यापासून मनसे या विषयावर आक्रमक आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक शहरातील वातावरण गेल्या दोन दिवसांपासून तणावपूर्ण होते. मात्र, राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. या पाश्‍र्वभूमीवर या विषयातून शांततेने चर्चेतून मार्ग काढण्यासाठी पुण्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे, असे बाबर यांनी सांगितले.

MNS Pune
'भाजपने राज ठाकरेंचा टप्प्यात कार्यक्रम केला!'

या संदर्भात बोलताना बाबर म्हणाले, ‘‘ पोलीस कारवाया सुरू होत्या. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. बुधवारी रात्री यातील बहुतेकांना पोलिसांनी सोडून दिले आहे. या सर्व गडबडीमुळे मला पुढे येता आले नव्हते. मात्र, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत आहे.

स्वाक्षरीची मोहीम राज्यातील सर्वच शहरात राबविण्यात येणार असून सर्वात आधी ही मोहीम पुण्यातून सुरू होत आहे. दरम्यान, महाआरती आणि हनुमान चालिसा पठण करणाऱ्या मनसेच्या शहरातील सुमारे दोनशे महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे यातील कुणावरही अटकेची कारवाई न करता बुधवारी सायंकाळी सर्वांना सोडून देण्यात आले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com