कुणी किती जागा बळकावल्या दाखवाच;राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान

पुणे महापलिकेकडे बावीसशे कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. त्यामुळे महापालिकेकडे पैसे नाहीत अशी खोटी माहिती पाटील यांनीपुणेकरांना सांगू नये.
कुणी किती जागा बळकावल्या दाखवाच;राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान
prashant 1.jpeg

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी कोणते चुकीचे काम केले आहे.ॲमिनिटीच्या कोणत्या जागा बळकावल्या, किती इमले बांधले तुम्ही दाखवाच अशाप्रकारचे खुले आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap)  यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना  दिले आहे.(Show how many plots someone has grabbed; NCP's city president challenges Chandrakant Patil) 

शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अनेक जागा गेल्या काही वर्षात  बळकावल्याचे सांगत येत्या दोन दिवसात या संदर्भातील यादीच प्रसिद्ध करणार असल्याचे पाटील यांनी आज सकाळी जाहीर केले होते. त्याला उत्तर देण्यासाठी शहराध्यक्ष जगताप यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत पाटील यांना आव्हान दिले आहे. 

शहराध्यक्ष जगताप म्हणाले, ‘‘ॲमिनिटी स्पेसचा चुकीचा वापर करण्याचा घाट भाजपाने घातला आहे. विशेष म्हणजे १८५ ॲमिनिटी स्पेसमधील तब्बल ७४ जागा या एकट्या कोथरूड मतदासंघात आहेत. या जागांचे पाटील नेकमे काय करणार आहेत.या जागा कुणाला देण्याची तयारी त्यांची चालवली आहे.’’

जगताप म्हणाले, ‘‘ॲमिनिटी स्पेसच्या बळकावलेल्या जागा सांगताना गेल्या चार वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती पुणेकरांना द्यावी. डिफर्ट पेमेंट पद्धतीत राष्ट्रवादीने हस्तक्षेप केल्याने पुणेकरांचे तब्बल शंभर कोटी तर चोवीस तास पाणी पुरवठा योजनेत किमान एक हजार कोटी रूपये वाचले आहेत हे पाटील यांनी ध्यानात घ्यावे.राष्ट्रवादी कॉंग्रेसने तत्परता दाखलिी नसती तर हे पैसे कुणाच्या घशात जाणार होते याचा विचार करावा’’

पुणे महापलिकेकडे बावीसशे कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. त्यामुळे महापालिकेकडे पैसे नाहीत अशी खोटी माहिती पाटील यांनी पुणेकरांना सांगू नये. या बावीसशे कोटींमधील फक्त एक हजार कोटी रूपये वापरले तरी ॲमिनिटी स्पेसच्या जागा वाचतील, असे जगताप यांनी सांगितले.  

केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्यात तब्बल एक हजार कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात काहीच काम दिसत नाही. स्मार्ट सिटी हा एक भूलभुलैया होता की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती असल्याचे जगताप यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in