Crime News: धक्कादायक! मासिक पाळीच्या रक्ताचा जादुटोण्यासाठी वापर; काय आहे प्रकरण?

पुरोगामी महाराष्ट्राला गालबोट लावणारी ही घटना पुण्यातून समोर आली आहे.
Crime news:
Crime news: Sarkarnama

Pune News: जगभरात जागतिक महिला दिन साजरा होत असताना एका 27 वर्षीय विवाहित महिलेच्या मासिक पाळीतील रक्ताची जादूटोण्यासाठी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला. पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाला गालबोट लावणारी ही घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून समोर आली आहे. ऐन अधिवेशनात हा प्रकार उघडकीस आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या घटनेचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले.

त्यानंतर आता या घटनेची दखल आता राज्य महिला आयोगाने घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही या घटनेप्रकरणी आरोपींवर कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश देणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच, पुण्यासारख्या शहरात अजूनही अंधश्रद्धेला बळी पडणारी कुटु्ंब आहेत ही दुदैवी असल्याची खंतही चाकणकर यांनी व्यक्त केली आहे.

Crime news:
Vasant More News : मनसेच्या वर्धापनदिनानंतर वसंत मोरे पुन्हा चर्चेत; पक्षातील विरोधकांना डिवचलं

27 वर्षीय पीडित महिला ही पुण्यातील विश्रांतवाडी येथे आपल्या माहेरी आली होती. तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिने आपल्या आई वडिलांना सांगितला. दोन वर्षांपूर्वी पीडित महिला आणि आरोपीचा प्रेम विवाह झाला होता. त्यानंतर पीडित महिला ही तिच्या सासरी बीड या ठिकाणी राहण्यास गेली. सासरच्या मंडळींनी मासिक पाळीच्या दरम्यान तिचे हातपाय बांधून मासिक पाळीचे रक्त काढत ते बाटलीत भरुन ५०हजार रुपयांमध्ये जादुटोण्यासाठी विकले, अशी धक्कादायक माहिती स्वत: पिडीतेने आपल्या घरच्यांना सांगितली.

महिलेने तिच्यासाठी घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर शेजारी राहणाऱ्या एका महिलेने स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून थेट विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणी पिडीत महिलेच्या सासु-सासरे,पती, मावस दीर आणि मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com