कबड्डीपटू मुलीच्या खूनप्रकरणी अजित पवारांचा पोलिसांना आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश पुणे पोलिसांना (Pune Police) दिले आहे. अजित पवार माध्यमांशी बोलत होते.

कबड्डीपटू मुलीच्या खूनप्रकरणी अजित पवारांचा पोलिसांना आदेश
अजित पवारसरकारनामा

मुंबई : कबड्डीपटू असलेली अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रीणींसमवेत कबड्डीचा सराव करीत असतानाच तिच्या नात्यातील मुलाने व त्याच्या साथीदारांनी तिच्या गळ्यावर कोयत्याने वार करून तिचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी काल बिबवेवाडी येथे घडला. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश पुणे पोलिसांना (Pune Police) दिले आहे. अजित पवार माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार
राष्ट्रवादीने गंभीर आरोप केलेले NCBचे समीर वानखेडेंना पुन्हा मुदतवाढ

''पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थीनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे. ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे,'' अजित पवार म्हणाले.

''शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल,'' अशा शब्दात अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाही. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

अजित पवार
चित्रा वाघ म्हणाल्या;सावित्रीच्या लेकींसाठी महाराष्ट्र बंद कधी करणार

या घटनेत मुलीचे शीर अक्षरशः धडापासून वेगळे झाले होते. अंगावर धरकाप उडविणारी घटना आज सायंकाळच्या सुमारास पुण्यात बिबवेवाडी येथे घडली. या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेजण ताब्यात घेण्यात आले आहेत.

क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14, रा. बिबवेवाडी) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तर ऋषिकेश उर्फ शुभम बाजीराव भागवत (वय 21, रा. लोहम, खंडाळा, जि. सातारा), त्याचे दोन साथीदार व अन्य दोघे अशा पाच जणांविरुद्ध अशा तिघांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.