पुण्यात थरकाप उडविणारा खून : १४ वर्षीय मुलीचे शीर धडावेगळे केले.

एकतर्फी प्रेमातुन खुनाची घटना घडली आहे. मुख्य तिघेजण व अन्य दोघे असे पाच संशयित आहेत. त्यापैकी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.
Crime
Crime Sarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कबड्डीपटू असलेली अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रीणींसमवेत कबड्डीचा सराव करीत असतानाच तिच्या नात्यातील मुलाने व त्याच्या साथीदारांनी तिच्या गळ्यावर कोयत्याने वार करून तिचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी बिबवेवाडी येथे घडला. या घटनेत मुलीचे शीर अक्षरशः धडापासून वेगळे झाले होते. अंगावर धरकाप उडविणारी घटना आज सायंकाळच्या सुमारास पुण्यात बिबवेवाडी येथे घडली. या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेजण ताब्यात घेण्यात आले आहेत.

क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14, रा. बिबवेवाडी) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तर ऋषिकेश उर्फ शुभम बाजीराव भागवत (वय 21, रा. लोहम, खंडाळा, जि. सातारा), त्याचे दोन साथीदार व अन्य दोघे अशा पाच जणांविरुद्ध अशा तिघांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Crime
‘ईडी’च्या ताब्यात असलेल्या डीएसकेंच्या घरात चोरी

क्षितीजा ही आठवीत शिकत होती, त्याचबरोबर ती कबड्डी खेळाडूही होती. नेहमीप्रमाणे ती तिच्या काही मैत्रीणींसमवेत मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी येथील यश लॉन्स परिसरामध्ये कबड्डीचा सराव करीत होती. त्यावेळी शुभम व त्याचे दोन साथीदार तेथे आले. मुली सराव करीत असतानाच, शुभमने क्षितीजाला खेळातून बाहेर ओढले. त्यानंतर त्याने त्याच्याकडील कोयत्याने क्षितीजाच्या गळ्यावर वार केले. त्याचबरोबर त्याच्या मित्रांनी देखील त्यांच्याकडील शस्त्रांनी वार केले.या हल्ल्यामध्ये क्षितीजाचे शीर धडापासून वेगळे झाले होते. या घटनेनंतरही क्षितीजाच्या मैत्रीणींनी आरोपीला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडील शस्त्रे, पिस्तुल मुलींवर रोखले. मात्र, त्याला गोळीबार करता आला नाही. या घटनेमुळे परिसरातील नागरीकांमध्ये घबराट पसरली.

Crime
शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या ठेवी लवकरच मिळणार

मुली कबड्डीचा सराव करीत असतानाच पोलिसांचे गस्तीवरील वाहन तेथून गेले होते. त्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. शुभम हा क्षितीजाचा दूरचा नातेवाईक आहे. या घटनेनंतर परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करून आरोपींना पकडण्याच्या सुचना दिल्या आहेत.

अल्पवयीन मुलगी व तिच्या चार मैत्रीणी कबड्डी खेळत होत्या. त्यावेळी तिचा दुरचा नातेवाईक असलेल्या मुलाने व त्याच्या साथीदारांनी मुलीवर कोयत्याने वार करून तिचा खुन केला. एकतर्फी प्रेमातुन खुनाची घटना घडली आहे. मुख्य तिघेजण व अन्य दोघे असे पाच संशयित आहेत. त्यापैकी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे, असे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com