धक्कादायक! वडीलांच्या मदतीने नातवाने केला आजीचा खुन; तुकडे नदीपात्रात फेकले

Pune Crime news| आजी बेपत्ता असल्याची तक्रार नातवानेच दिली होती
Pune Crime news|
Pune Crime news|

पुणे : पुण्यातून आजी आणि नातवाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. घर सोडून जाण्यास सांगितल्याच्या आणि दागिने न दिल्याच्या रागातून नातवानेच आजीचा खुन केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे. धक्कादायक म्हणजे या खुनात वडीलांनीही मुलाला साथ दिल्याने आई आणि मुलाच्याही नात्याला काळीमा फासला गेला आहे. उषा गायकवाड (वय ६२ ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी साहिल ऊर्फ गुड्डु संदीप गायकवाड (वय २० रा. म्हसोबानगर, मुंढवा) व संदीप गायकवाड (वय ४२, रा. गुरुकृपा सोसायटी, लक्ष्मी इन्क्लेव्ह, केशवनगर, मुंढवा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शीतल मनोज कांबळे (वय ४०, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

Pune Crime news|
लाख कुळे आली तरी...; पवारांना आव्हान देणाऱ्या बावनकुळेंना आव्हाडांचे सणसणीत प्रत्युत्तर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यापासून उषा गायकवाड बेपत्ता होत्या. यावर साहिल गायकवाड याने स्वत: शीतल यांच्यासोबत पोलिसांत आजी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. याच दरम्यान अनेकदा फिर्यादी शीतल कांबळे (उषा गायकवाड यांची मुलगी) यांनी वारंवार आई कुठे आहे अशी भाऊ आणि पुतण्याकडे विचारणा केली पण दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी मुंढवा पोलिसात तक्रार देत हा सर्व प्रकार त्यांनी मुंढवा पोलिसांना सांगितला.

तपासादरम्यान पोलिसांनाही संबंधित महिलेचा खुन करुन तिला नदीत टाकल्याचा संशय आला होता. यावर पोलिसांनी वडील संदीप गायकवाड आणि साहिल गायकवाड यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. धक्कादायक म्हणजे नातवाने आजीचे तुकडे करून नदीपात्रात फेकून दिले होते. शीतल कांबळे यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तातडीने पोलिसांनी शोध सुरु केला. त्यादृष्टीने मुंढवा पोलिसांकडून मुंढव्यापासून ते यवतपर्यंतच्या नदीपात्रात शोध घेतला जात होता. नातवाने अक्षरशः आजीच्या शरीराचे तुकडे करून नदीत टाकल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये उघड झाले

आजी सतत घर सोडून जा, असे सांगत असल्याने आजीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आजीच्या शरीराचे तुकडे करून ते नदीत टाकले, अशी कबुली साहिलने दिली. दरम्यान फिर्यादी शीतल कांबळे यांनी वडील व भाऊ देखील काही वर्षापासून बेपत्ता आहेत. त्याबाबत विविध पोलिस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दाखल केली होती. आता वडील आणि नातवाने आईचा खुन केल्याचा हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर त्यांचेही अशाच पद्धतीने बरे वाईट झाले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in