धक्कादायक! पुणे मेट्रोचे नाव वापरून तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक

Pune Crime News : तक्रार दाखल, पोलीसांकडून अधिक तपास सुरू
Pune Crime
Pune Crime Sarkarnama

Pune Crime News : पुणे मेट्रोचे नाव वापरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील शिवाजीनगर भागात समोर आला आहे. तब्बल १ कोटी २१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.

शिवाजीनगरमधील कामगार पुतळा परिसरात असलेल्या जागेवर मेट्रोचा प्रकल्प होणार आहे, असे खोटे सांगून गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांनी व्यावसायीकांसह नातेवाईकांनाही तब्बल १ कोटी २१ लाख रुपयांची फसवणूक केली.

पंकज गुल जगासिया यांनी यासंबंधी तक्रार दिली असून या प्रकरणी ईश्वर चंदुलाल परमार (वय ७०) व सनत ईश्वर परमार (वय ४६) यांच्यावर बंडगार्डन पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

Pune Crime
Winter Session : शाईफेकीचा धसका : विधिमंडळात शाईपेन नेण्यास बंदी!

नेमकं घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्वर परमार व सनत परमार यांनी कामगार पुतळा परिरसातील स्वतःच्या जागेवर मेट्रोचा प्रकल्प होणार होता. मात्र, संबंधित जागेवर विकसनाचे अधिकार त्यांना नव्हते. तरीही दोघांनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने संबंधित जागेवर प्रोजेक्ट होणार असल्याचे खोटे कारण पंकज जगासिया यांना सांगितले.

या ठिकाणी गुंतवणुक केल्यास जादा रक्कम मिळेल, असे अमिष दाखवत फसवणूक केली आहे. आरोपींनी संबंधित प्रोजेक्टमध्ये लोकांना गुंतवणुक करण्यास भाग पाडून १ कोटी २१ लाख रुपये घेतले. मात्र २०१६ पासून आतापर्यंत त्याठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे पंकज गुल जगासिया यांनी यासंबंधीची तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com