धक्कादायक : १० हजार दस्तांची बोगस नोंदणी; ४४ उपनिबंधक निलंबित

तुकडाबंदी कायद्यानुसार शेतजमीनीचे हस्तांतर करताना जमिनीचा तुकडा पाडता येत नाही.
Sub Registrar
Sub RegistrarSarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : १० हजार ६३५ मालमत्तांची बोगस नोंदणी करणाऱ्या राज्यातील तब्बल ४४ उपनिबंधकांना (Sub Registrar) नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी निलंबित करून या साऱ्या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात मोठ्याप्रमाणात अर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून इतक्या मोठ्या संख्येने बोगस दस्त नोंदणी होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.

Sub Registrar
प्रदेशाध्यक्षांचा इन्कार, पण कॉंग्रेसचे आमदार नाराज; आज हायकमांडला भेटणार!

या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. ‘रेरा’ आणि ‘तुकडाबंदी’ कायद्याचे उल्लंघन करून करण्यात आलेल्या दस्त नोंदणीची तपासणी करणाऱ्या पथकाच्या तपासणीत हा गंभीर प्रकार उजेडात आला आहे.या पथकाने या प्रकरणाचा अहवाल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला दिला. त्यानुसार सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे.

Sub Registrar
मुस्लिम मनसैनिक नाराज; राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर पक्षात राजीनामा सत्राला सुरुवात

तुकडाबंदी कायद्यानुसार शेतजमीनीचे हस्तांतर करताना जमिनीचा तुकडा न पाडणे बंधनकारक आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी निर्धारित प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांच्या दस्ताची नोंदणी सक्षम आधिकाऱ्याच्या पूर्वपूरवानगी किंवा ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय करू नये, अशी अट आहे. या प्रकरणात या साऱ्या नियमांचा भंग करण्यात आला आहे.

बनावट दस्त नोंदणी केलेल्या ४४ आधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत राज्य सरकारकडे मार्गदर्शक सूचना मागविण्यात आल्या होत्या. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निलंबन आणि विभागीय चौकशीची कारवाई करण्यात आली आहे. २०० ते ४०० बनावट दस्त नोंदविलेल्या आधिकाऱ्यांची बदली आणि विभागीय चौकशी केली जाणार आहे. २०० पेक्षा कमी दस्तांची नोंदणी केलेल्या आधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. दहापेक्षा कमी बनावट दस्त नोंदवलेल्या आधिकाऱ्यांना नोटीस देऊन खात्यांतर्गत चौकशी केली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com