Thackeray Group : ठाकरे गटाला धक्का; पिंपरी-चिंचवडच्या 'त्या' पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Chinchwad News : हकालपट्टी केलेल्या आठ पदाधिकाऱ्यांची भूमिका अस्पष्ट
Eknath Shinde, Shrirang Barane
Eknath Shinde, Shrirang BaraneSarkarnama

By Election News : शिवसेना फुटीनंतर खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) वगळता पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश पदाधिकारी हे 'वेट अॅन्ड वॉच'च्या भूमिकेत होते. त्यामुळे त्यांनी आजपर्यंत शिवसेनेत प्रवेश केलेला नव्हता. मात्र, काल प्रथमच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे आणि पिंपरी-चिंचवड शहर माजी महिला संघटिका उर्मिला काळभोर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटातील आठ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे.

Eknath Shinde, Shrirang Barane
Nana Patole News : नाना पटोले म्हणाले, पहाटेच्या शपथविधीची कॉंग्रेसला कल्पनाच नव्हती

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यावेळी त्यांच्या रहाटणीतील प्रचारसभेत हा प्रवेश खासदार बारणे यांच्या पुढाकारातून झाला. आकुर्डी भागातून प्रमोद कुटे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. स्मार्ट सिटीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. विभागप्रमुख फारुक शेख, मंगेश कुटे यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.

Eknath Shinde, Shrirang Barane
Nashik News; भाजप दत्तक नाशिकला विसरले की काय?

खासदार बारणे म्हणाले, "शहराच्या विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वसन दिलेले आहे. मुख्यमंत्र्यांवरील विश्वासातून ठाकरे गटातील लोक शिवसेनेत येत असून त्यामुळे शहरात शिवसेनेची ताकद वाढत आहे."

कुटे म्हणाले, "शहरातील (PCMC) शास्तीकराचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे अनधिकृत घरांचा प्रश्न सुटणार आहे. प्राधिकरण बाधितांना साडेबारा टक्के परतावा देण्याबाबत मुख्यमंत्र्य़ांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केला आहे."

Eknath Shinde, Shrirang Barane
Kasba By-Election : ऐनवेळी कसब्यातील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची सभा रद्द : कारण काय?

हे पक्षांतर नाही...

यावेळी माजी नगरसेवक कुटे यांनी मी पक्षांतर केले नसून शिवसेनेतच असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, "केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) शिवसेना हे पक्षाचे नाव व चिन्ह मूळ शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटाला तथा बाळासाहेबांच्या शिवसेनेला दिले. त्यामुळे तो गट आता शिवसेना म्हणून ओळखला जातो. तर, ठाकरे शिवसेनेला ठाकरे गट म्हणायला सुरुवात झाली आहे."

पुढे ते कुटे म्हणाले की, "शिवसेना (Shivsena) पक्षाकडून धनुष्यबाण चिन्हावर मी व आम्ही निवडून आलो आहे. आताही आमचा पक्ष शिवसेना व निवडणूक चिन्ह धनुष्यबाणच आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वा भाजपमध्ये गेलो असतो, तर ते पक्षांतर ठरले असते."

पुढे कुटेंनी १९६६ ला स्थापन झालेल्या शिवसेनेचा मालक कोण, हे न्यायालय ठरवेल, अशी गुगलीही टाकली.

Eknath Shinde, Shrirang Barane
MPSC News Update : मोठी बातमी! विद्यार्थ्यांची मागणी मान्य; नवीन अभ्यासक्रम पद्धती २०२५ पासून लागू होणार

दरम्यान, ठाकरे गटाच्या (Thackeray Group) आदेशाचे उल्लंघन करून काम केल्याचा ठपका ठेऊन आठ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यात चिंचवड विधानसभा संघटक अनिता तुतारे, उपशहर संघटक रजनी वाघ, विभाग संघटक शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा संघटक गणेश आहेर, रवि घाटकर यांचा समावेश आहे. त्यांनी मात्र अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com