शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक
babasaheb purandaresarkarnama

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक

त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय ९९) यांची प्रकृती चिंताजनक असून रविवारी संध्याकाळी त्यांना दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत.

दिवाळी आधीपासूनच ते आजारी असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. २६ ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली.

त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्यावतीने विचारपूस करण्यात येत आहे. आपल्या ओघवती, लालित्यपूर्ण वत्कृत्त्वाने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र महाराष्ट्रासमोर उभे केले आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरविले आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिया झाला होता. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटीलेटरवर आहेत, अशी माहिती रुग्णालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in