shiv sena : माजी मंत्री विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी

"संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली," असे विजय शिवतारे यांनी म्हटलं होतं.
vijay shivtare
vijay shivtaresarkarnama

पुणे : माजी आमदार, शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे (vijay shivtare) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांच्या आदेशाने ही कारवाई केल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे. याबाबत 'सामना'ने वृत्त दिले आहे. (vijay shivtare latest news)

पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप विजय शिवतारे यांच्यावर शिवसेनेने केला आहे. काही दिवसापूर्वी शिवतारे यांनी उद्धव ठाकरे व शिवसेना यांच्याविरोधात विधान केलं होतं. "उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर अजूनही शिवसेना पुन्हा एक होऊ शकते. मातोश्रीने फक्त संजय राऊतांसारख्यांना बाजुला केलं पाहिजे," असं विधान विजय शिवतारे यांनी केलं होतं."संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली, मी अजून शिवसेनेतच आहे," असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं होतं.

विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार आहे. ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचं प्रतिनिधीत्व करतात. विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई कऱण्यात आली आहे.

शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांपैकी फक्त शिवतारेच नाही तर अनेक आमदारांनी आतापर्यंत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.शिवसेना खासदार संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याची टीका बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.

vijay shivtare
ठाकरेंची कारवाई शिंदेंनी धुडकावली ; नरेश म्हस्केंची ठाणे जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती

"संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते असले तरी ते शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे ते असं बोलतात. हे माझं मत आहे. ते खरं आहे की खोटं, हे मला माहीत नाही.त्यांनी असं वर्तन करून नये," असे केसरकर यांनी म्हटलं आहे. पक्षबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी मातोश्रीवर बैठका घेण्याचा धडाकाच लावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in