Shiv Sena : बारणे, आढळरावांवर मुख्यमंत्र्यांनी सोपवली मोठी जबाबदारी

Shivajirao Adhalrao, Shrirang Barne big responsibility : पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
Shivajirao Adhalrao, Shrirang Barne
Shivajirao Adhalrao, Shrirang BarneSarkarnama

Shivajirao Adhalrao, Shrirang Barne big responsibility : शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गट हा शिवसेना असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर आता या पक्षाने आपली बांधणी सुरु केली आहे.त्याच्या पहिल्या टप्यात राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी संपर्कप्रमुख नेमले आहेत.

शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे लोकसभा संपर्कप्रमुख नियुक्त केले आहेत.पक्ष सचिव संजय मोरे यांनी ते जाहीर केले.मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी पुरुष आणि महिला असे दोन संपर्कप्रमुख नेमण्यात आले आहेत.

राज्यातील इतर मतदारसंघाकरीता,मात्र एकच संपर्कप्रमुख आहे. तूर्तास अपवाद वगळता दोन मतदारसंघासाठी एक संपर्कप्रमुख देण्यात आला आहे.

स्थानिक खासदाराला त्याच्याच मतदारसंघाचे संपर्कप्रमुखपद करण्यात आले आहे. त्यातून मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे मावळसह पुणे लोकसभेचे संपर्कप्रमुखपद देण्यात आहे. तर,शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याकडे शिरूरची ही जबाबदारी दिली गेली आहे.

बारामतीचे संपर्कप्रमुख म्हणून माजी मंत्री आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्याकडे ठाण्यासह मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याणची सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे.

Shivajirao Adhalrao, Shrirang Barne
Chinchwad Bypoll Election Result : चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांचं लीड वाढलं..

यवतमाळच्या खासदार तथा संपर्कनेत्या भावना गवळी यांच्याकडे त्यांच्या मतदारसंघाच्या जोडीने चंद्रपूर,संपर्कनेते आणि बुलढाण्य़ाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बुलढाणा,अकोला,रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्याकडे रामटेक, नागपूर मतदारसंघ देण्यात आला आहे.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याकडे हिंगोलीसह नांदेड, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्याकडे त्यांच्याच मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखाची जबाबदारी सोपविली गेली आहे.दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहूल शेवाळे हे त्यांच्या मतदारसंघाचे संपर्कप्रमुख,तर त्यांच्या पत्नी कामिनी शेवाळे या ह्याच मतदारसंघाच्या महिला संपर्कप्रमुख असणार आहेत.

Shivajirao Adhalrao, Shrirang Barne
Pune By Election Result : कसब्यात रासने की धंगेकर ; चिंचवडचा नवा आमदार कोण ?

मुंबईतीले लोकसभा संपर्कप्रमुख असे

उत्तर मुंबई - आ.प्रकाश सुर्वे - शीतल म्हात्रे

उत्तर-पश्चिम मुंबई - उदय सावंत - शीतल म्हात्रे (प्रभारी)

ईशान्य मुंबई - संजय मशीलकर - संध्या वढावकर

उत्तर-मध्य मुंबई - आ. सदा सरवणकर - वीणा भागवत

दक्षिण मुंबई - यशवंत जाधव - ममता पालव

राज्यातील इतर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख

मतदारसंघ - संपर्कप्रमुख

वर्धा, गडचिरोली - किरण पांडव

जालना,परभणी - मा.आ.अर्जुन खोतकर

छत्रपती संभाजीनगर - गोपाळ लांडगे

धाराशीव,लातूर - ज्ञानराज चौगूले

नंदूरबार,धुळे - चंद्रकांत रघुवंशी

जळगााव,रावेर - आनंदराव जाधव

दक्षिण नगर - विजय नहाटा

शिर्डी - यशवंत जाधव

सातारा,सांगली - मा.आ.राजेश क्षीरसागर

हातकणंगले - योगेश जानकर

पालघर,रत्नागिरी - मा.आ.रविंद्र फाटक

रायगड - आ. भरत गोगावले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in