बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास शिवसेनेचा विरोध; निर्णय लादल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा...

बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीही मांडण्यात आला होता.
बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास शिवसेनेचा विरोध; निर्णय लादल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा...
Balgandharva Rangmandir Latest NewsSarkarnama

पुणे : बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharva Rangmandir) न पाडता उर्वरित जागेवर नाट्यगृह बांधण्यास शिवसेनेचा (Shivsena) विरोध नाही, मात्र रंगमंदिर पाडण्याचा प्रस्ताव जबरदस्तीने पुणेकरांवर लादला तर शिवसैनिक पुणेकरांच्या वतीने रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाहीत, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. याबाबतचे पत्रही महापालिका (PMC) आयुक्तांना देण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, (Sanjay More) माजी गटनेते शिवसेना पृथ्वीराज सुतार, शहरप्रमुख गजानन थरकुडे, प्रशांत बधे, शाम देशपांडे आदी उपस्थित होते. (Balgandharva Rangmandir Latest Marathi News)

Balgandharva Rangmandir Latest News
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास पुणे पालिकेकडून करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रियाही प्रशासनाकडून सुरू करण्यात आली. मात्र, बालगंधर्व रंगमंदिर पाडून तेथे नाट्यसंकुल उभारण्याबाबत विविध मतप्रवाह पुढे येत असतांना शिवसेनेकडून मूळ वास्तू पाडण्यास विरोध दर्शवण्यात आला आहे. बालगंधर्व नाटय़ कलावंत आणि पुणेकरांसाठी अस्मितेचे प्रतीक असून रंगमंदिराचा पुनर्विकास करताना मूळ वास्तू कायम ठेवून नवीन नाटय़गृह उभारता येऊ शकते, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीही मांडण्यात आला होता. तेंव्हाही राजकीय पक्ष, पुणेकर, सामाजिक संघटना आणि नाटय़ कलाकारांकडून विरोध दर्शवण्यात आला होता. त्यामुळे हा विषय मागे पडला होता. मात्र आता पुन्हा हा प्रस्ताव समोर आला आहे. रंगमंदिराची मूळ वास्तू कायम ठेवून विस्तारीकरण करण्यास शिवसेनेचा पाठिंबा आहे. मात्र, प्रशासनाने पुणेकरांवर जबरदस्तीने हा प्रस्ताव लादण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात आला आहे.

Balgandharva Rangmandir Latest News
"हिंदुजननायक कोणाची खासगी मालमत्ता नाही": आढळराव-पाटलांनी मनसेला ठणकावले

दरम्यान, कर्वे रस्त्यावरील नव्याने बांधलेल्या दुमजली उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तज्ज्ञांशी चर्चा न करता उड्डाणपूल बांधण्यात आल्याने छोटय़ा-मोठय़ा रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असून पार्किंगचा प्रश्नही उपस्थित झालायं. या परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तज्ज्ञ, तंत्रज्ञ, नागरिक आणि सामाजिक संस्थांना विश्वासात घेऊन उपाययोजना कराव्या, अशी मागणी केली. याबरोबरच विस्कळीत पाणी पुरवठय़ाबाबतही नाराजी व्यक्त करताना पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.