Devendra Fadnavis कटुता संपवा, कामाला लागा ; ठाकरे गटाकडून साद

Devendra Fadnavis : . फडणवीस यांना आता त्याची खंत वाटत असेल, तर त्या विषाचे अमृतही त्यांनी करावे.
Devendra Fadnavis News, Political News in Marathi
Devendra Fadnavis News, Political News in MarathiSarkarnama

Devendra Fadnavis : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गट अन् भाजप विरोधात ठाकरे गटाची टीकेची धार अधिक टोकदार झाली आहे. 'सामना'तून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद घातली आहे. (Devendra Fadnavis latest news)

फडणवीसांचा मूळ स्वभाव हा सामोपचाराने मिळून मिसळून राहण्याचा होता. मात्र सत्ता गेल्याने ते बिघडले. विजयानंतर आनंद होत असला तरी, उन्माद चढणे हे प्रौढत्वाचे लक्षण मानले जात नाही. फडणवीसांच्या मूळ स्वभाव हा सामोपचाराने मिळून मिसळून राहण्याचा होता. मात्र सत्ता गेल्याने ते बिघडले, अशी टीका ठाकरे गटानं केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही ऐवढी कटुता आली नाही हे नाकारता येत नाही, फक्त कटुता नव्हे तर सूडाच्या राजकारणचे विषारी प्रवाह उसळत आहे. या विषारी प्रवाहाचे मूळ भाजपच्या अलीकडच्या राजकारणात आहेत. फडणवीस यांना आता त्याची खंत वाटत असेल, तर त्या विषाचे अमृतही त्यांनी करावे. राज्यातील कटुता आता राजकीय वैमनस्यापर्यंत गेली, असे अग्रलेखात नमूद केलं आहे.

Devendra Fadnavis News, Political News in Marathi
IAS IPS Transfer : सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत शिंदे-फडणवीसाचं अखेर ठरलं..

'राजकीय मतभेद असले तरी ते एकमेकांशी बोलू शकतात. ही कटुता कशी कमी करत येईल यासाठी फडणवीस प्रयत्न करणार असल्याचेही 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. दोन्ही सत्तांतरात केंद्रीय तपास यंत्रेणेचा पुरेपुर वापर केला गेला.यशवंतराव चव्हाण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांनी बेरजेचं राजकारण केलं. भाजपने काही भुंकणाऱ्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे. ते शरद पवारांपासून ठाकरेंपर्यंत ज्या भाषेचा वापर करतात, त्यामुळे राज्याच्या राजकारणातील कटुता कशी कमी होईल,' असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला आहे.

"शिवसेना राहता कामा नये, म्हणूनच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या त्या विषाला 'बासुंदी'चा दर्जा देण्याचा जो सध्या अचाट प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार ? असा टोला मुख्यमंत्री शिंदेंना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com