महाविकास आघाडीची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार ? उद्धव ठाकरे की शरद पवार..

कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी अराजकीय गप्पा मारल्या, अराजकीय प्रश्नांना उत्तर दिले.
Shrikant Shinde, Sarkarnama Open Mic Challenge
Shrikant Shinde, Sarkarnama Open Mic Challengesarkarnama

पुणे :"देशात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आली तर पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार ?.. उद्धव ठाकरे की शरद पवार" या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉं. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं. ते सरकारनामा ओपन माईक चॅलेंज (Sarkarnama Open Mic Challenge) या कार्यक्रमात बोलत होते.

राज्यातील तरुण नेत्यांच्या मनातील महाराष्ट्र काय आहे, पत्रकारांच्या भूमिकेतून नेत्यांनीच नेत्यांना विचारलेले तिखट प्रश्न अन् त्याला मिळालेले हजरजबाबी उत्तर, राजकारणापलीकडे जाऊन रंगलेला हा 'राजकीय सामना'नुकताच सकाळ डिजिटलतर्फे 'Sarkarnama Open Mic Challenge'या कार्यक्रमात पाहायला मिळाला. राजकीय कार्यक्रमातील हा हटका प्रयोग नुकताच पुण्यात रंगला. कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी अराजकीय गप्पा मारल्या, अराजकीय प्रश्नांना उत्तर दिले.

Shrikant Shinde, Sarkarnama Open Mic Challenge
Sarkarnama Open Mic Challenge: इम्तियाज जलील खरंच आहे का भाजपची टीम बी

'सरकारनामा हिट वेव्ह,' 'सरकारनामा फेस ऑफ',अशा रंगतदार कार्यक्रमात उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel), काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) व भाजपचे आमदार परिणय फुके (parinya phuke) यावेळी उपस्थित होते.

Shrikant Shinde, Sarkarnama Open Mic Challenge
सरकारनामा Open Mic : सर्वपक्षीय नेत्यांनी अराजकीय मैफिलीत उडवली धमाल

"खासदार म्हणून तुमची ही दुसरी टर्म आहे. या दोन्ही टर्ममध्ये संसदेत तुम्हाला काय फरक वाटतो?" असा प्रश्न राष्ट्रवादीच्या राज्यमंत्री आदित्य तटकरे यांनी श्रीकांत शिंदे यांना विचारला. त्यावर शिंदे म्हणाले,"2014 मध्ये सगळचं नवीन होतं. २०१४ चा सुरवातीलाचा काळ सगळ्या गोष्टी शिकण्यात आणि समजण्यातच गेला. त्यावेळी संसदेत विविध भाषणं अनुभवता आले. २०१९ मध्येही नवीन खूप लोक निवडून आले आहेत. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतयं. दोन्ही वेळेला वेगळा अनुभव आला,"

Shrikant Shinde, Sarkarnama Open Mic Challenge
भाजप, मोदी आजही जवाहरलाल नेहरुंवर टीका का करतात ? ; आमदार परिणय फुके म्हणाले..

"केंद्रात जर तुमची सत्ता आली, तर पंतप्रधान म्हणून उद्धव ठाकरे चांगले असू शकतात की शरद पवार?" या इम्तियाज जलील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी 'उद्धव ठाकरे' असं उत्तर दिलं. आमदार धीरज देशमुख यांनी श्रीकांत शिंदे यांना तुमची आवडती अभिनेत्री कोण असा प्रश्न केला, यावर एकाही अभिनेत्रीचं नाव न घेता 'अनेक अभिनेत्री आवडतात' असं उत्तर शिंदे यांनी दिलं.

Shrikant Shinde, Sarkarnama Open Mic Challenge
पुढच्या टर्ममध्ये कॅबीनेटमंत्री व्हायला आवडेल ! .. आघाडीचं सरकार २५ वर्ष टिकेल !

"कोरोना काळात तुम्ही वैद्यकीय मदत केंद्र सुरु केलं आहे, ते तुम्ही महाराष्ट्रभर सुरु करणार का?" असा प्रश्न परिणय फुके यांनी केला. त्यावर शिंदे म्हणाले,"वैद्यकीय क्षेत्रात आम्ही फक्त ठाणे जिल्ह्यातच काम करीत नाही, तर महाराष्ट्रभर २४ जिल्ह्यात आमचं वैद्यकीय पथक काम करीत आहे.यातील स्वयंसेवक कुठलही मानधन न घेता हे काम करीत आहेत. सगळ्याच पक्षानी हे काम केलं तर वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडू शकेल."

महाविकास आघाडी सरकारमध्ये तुम्ही कुणाच्या कामावर समाधानी आहात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे ? " यावर शिंदे म्हणाले,''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाली महाविकास आघाडी सरकारचं उत्तम काम सुरु आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे काम करीत आहेत. त्याचे कामही उत्तम सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com