
चाकण (पुणे) : "शिवसेनेचे (shivsena) बंडखोर गुवाहटीला गेले आहेत, त्यांची प्लोअर टेस्ट होईल तेव्हा होईल पण फ्लोअर टेस्टच्या आधी त्यांना रोड टेस्ट करावी लागणार आहे. त्यासाठी मुबंई आणि पुण्यात शिवसैनिकांनी तयार राहावे," असे सांगत विधानपरिषद आमदार सचिन आहिर (Sachin Ahir) यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. (Eknath Shinde news)
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या समर्थनार्थ शिरुर लोकसभा मतदार संघात चाकण येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा रविवारी घेण्यात आला. त्यावेळी आहिर बोलत होते. यावेळी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते. (Maharashtra Political Crisis)
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, " राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचा सर्वात जास्त फटका शिवसेनेला बसल्याचा गंभीर आरोप माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे. राज्यात 150 ते 200 जीआर काढलेत ऐवढच नाही तर पुणे जिल्ह्याच्या DPDC चा 170 कोटीचा निधी एकतर्फी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार आणि आमदारांना वाटपही केला आहे,"
निधी वाटप करताना शिवसेनेला मात्र डावलण्यात आल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कारभाराची आढळराव पाटलांनी भरसभेत पोलखोल केली."आता आम्ही सहन तरी किती करायचं," अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे यांनीही यावेळी शिवसेनेला घरचा आहेर दिला.
"शिवसेनेला नुसतं समर्थन नाही तर आमच्या मनातल्या अडचणीही आता तुम्हाला ऐकाव्या लागतील. मागच्या तीन वर्षात शिवसैनिकांची पाठराखण झाली नसल्याने शिवसैनिकांची भिकाऱ्यासारखी झाली आहे," अशी खंत शरद सोनवणे यांनी व्यक्त केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.