आढळरावांच्या 'होम स्पीच' वर राष्ट्रवादीच्या नेत्याची तुफान फटकेबाजी ; चर्चांना उधाण

देवदत्त निकम यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची धुरा यशस्वी सांभाळली होती.
Devdutt Nikam
Devdutt Nikamsarkarnama

पारगाव : राजकारणात एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले देवदत्त निकम (Devdutt Nikam)अन् शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) एकत्र आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

देवदत्त निकम हे राष्ट्रवादीचे (ncp) नेते, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. गेल्या निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची धुरा यशस्वी सांभाळणाऱ्या निकमांमुळे आढळरावांचा झालेला पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र आल्यानं पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लांडेवाडी या त्यांच्या जन्मगावी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं शिवसेनेचे राज्यातील नेते स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा देत आहे.

Devdutt Nikam
महाविकास आघाडीची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार ? उद्धव ठाकरे की शरद पवार..

खासदार संजय राऊत यांनी नुकतीच या स्पर्धेला भेट दिली. शनिवारी भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी स्पर्धेला भेट देऊन फलंदाजी केली. त्यांच्या 'बॅटिंग'ने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथे स्वखर्चातून कायमस्वरूपी क्रिकेट स्टेडियम उभारले आहे. खासदार श्रीकांत शिंदे, खासदार अनिल देसाई, खासदार संजय राऊत, माजी मंत्री शिवसेना संपर्क नेते सचिन अहिर यांनी स्पर्धेला भेटी दिल्या आहेत, शिवसेनाव्यतिरिक्त अद्याप दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी स्पर्धेला भेट दिलेली नाही.

Devdutt Nikam
भाजप, मोदी आजही जवाहरलाल नेहरुंवर टीका का करतात ? ; आमदार परिणय फुके म्हणाले..

संजय राऊत यांनी स्पर्धेला भेट दिली होती. ते म्हणाले, "आघाडी सरकार चालवताना काही तडजोडी कराव्या लागतात त्यामुळे काळजी करू नका मुख्यमंत्री , शिवसेना पक्ष तुमच्या नेत्याच्या पाठीशी आहे आढळराव पाटील पुढील वेळी संसदेत असतील," त्याच्या या वक्तव्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

राऊतांच्या या फटकेबाजी नंतर दुसयाच दिवशी देवदत्त निकम यांनी स्टेडियमला भेट देऊन बॅटिंग सुध्दा केली. त्याच वेळी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,आढळराव पाटील व शिवसेनेचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

देवदत्त निकम हे वळसे पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांना राष्ट्रवादीने आढळराव पाटील यांच्या विरुध्द उमेदवारी दिली होती त्यावेळी निकम यांनी कडवी झुंज दिली, परंतु निकम यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता.

मागील लोकसभा निवडणुकीत निकम यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची धुरा यशस्वी सांभाळली होती, यावेळी आढळराव पाटील यांचा झालेला पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे.

राज्यात जरी महाविकास आघाडी असली तरी शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व शिवसेनेचे अद्याप मनोमिलन झालेले नाही. या दोन्ही पक्षात अनेकदा संघर्ष झालेला पाहावयास मिळत आहे. त्यातच देवदत निकम यांनी स्पर्धेला हजेरी लावत प्रत्यक्ष ग्राउंड बॅटिंग केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहे.

देवदत्त निकम म्हणाले, "मागील आठवड्यात वळती या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,आढळराव पाटील व मी एकत्र आलो असताना आढळराव पाटील यांनी स्पर्धेला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. तालुक्यात जर किक्रेट स्टेडीयमच्या माध्यमातून चांगले काम उभे राहिले आहे. या माध्यमातून तालुक्यात अनेक खेळाडू घडतील. राज्यात महाविकास आघाडीच्या माधमातून नेते एकत्र आले आहे त्यामुळे एक चांगल्या सुरु असलेल्या स्पर्धेला भेट देण्यात गैर काहीच वाटत नाही,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com