बिबट्या सफारीचा पट्टा आपल्याच हाती, चिंता नको : सचिन अहिरांचे जुन्नरकरांना आश्वासन

Junnar Leopard safari News| महाविकास आघाडी टिकविणे हे नेत्यांची जबाबदारी जरी असली तरी स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची देखील जबाबदारी आहे.
बिबट्या सफारीचा पट्टा आपल्याच हाती, चिंता नको : सचिन अहिरांचे जुन्नरकरांना आश्वासन
Sachin Ahirsarkarnama

Junnar Leopard safari News

पुणे : ''बिबट्या सफारी पळविण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी, त्याचा पट्टा आपल्या हातात आहे. त्यामुळे जुन्नर बिबट्या सफारी बाबत जुन्नरवासीयांनी चिंता करु नये. असे आश्‍वासन शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी दिले. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्‍या निवासस्थानी शुक्रवारी (ता.६) संध्याकाळी शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

'' गेली २५ वर्षे ज्यांच्या सोबत संघर्ष केला. त्यांच्यासोबत दोन वर्षात जुळवुन घेता येईल, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. मात्र आता महाविकास आघाडी टिकविणे हे नेत्यांची जबाबदारी जरी असली तरी स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची देखील जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे राज्यात महाविकास आघाडाची समन्वय समिती आहे. त्याप्रमाणे जिल्हापातळीवर देखील समन्वय समिती असण्याची गरज आहे, अशी मागणी मी नेते संजय राऊत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. या समन्वय समितीमध्ये जिल्हाप्रमुख आजी माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल तर विविध प्रकल्प मार्गी लावण्यात सोपे होणार असल्याचे यावेळी सचिन अहिर म्हणाले.

Sachin Ahir
ओबीसी आरक्षण : फडणवीसांनी केंद्र सरकारकडे इम्पिरिकल डेटा कशासाठी मागितला होता?

"सध्या जुन्नर बिबट्या सफारीचा प्रश्‍न आहे. ही सफारी पळविण्याचा प्रयत्न झाला. तरी त्याचा पट्टा आपल्या हातात आहे. त्यामुळे काळजी करु नका. वनविभाग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच असल्याने सफारी बबतचे सर्व प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या सहीनेच मंजुर होणार आहे. असेही अहिर यांनी सांगितले. शिवसेना पक्ष आहे म्हणुन शिवसैनिकांचे अस्तित्व आहे. आपले अस्तित्व राखायचे असेल तर गावागावात पोहचून पक्षाचा विस्तार होणे जरुरी आहे. यासाठी मी स्वतः जुन जुलै महिन्यात जिल्हा परिषदेच्या ८२ गटात भेटी देऊन पक्षविस्तार करणार आहे, असेही अहिर यांनी सांगितले.

शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नसल्याच्या २२ आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत. यावर संख्याबळावर निधीचे वाटप व्हावे अशी शिवसेनेची भुमिका असून, याबाबत लवकरच सुत्र ठरविणार असल्याचे अहिर यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख माऊली कटके, माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.