शिवसेनेचा बंडखोरांना इशारा : वेळीच सावध व्हा, नाहीतर सगळेच कायमचे 'माजी' होतील

आता किरीट सोमय्यांना या सर्व शिवसेना आमदारांची पाद्यपूजा करावी लागेल असे दिसते, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
eknath shinde, Uddhav Thackeray
eknath shinde, Uddhav Thackeraysarkarnama

पुणे : शिवसेनेत (shivsena) बंड झाल्यानंतर विधानसभा बरखास्त होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिल्यानं राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागलं आहे. यावर शिवसेनेचे मुख्यपत्र 'सामना'तून भाजपवर टीकेचे बाण सोडलं आहेत. (eknath shinde news update)

किरीट सोमय्यांचे यापुढे कसे होणार ?

आम्हाला भाजपच्या नैतिक अधिष्ठानाचे कौतुकच वाटते. कालपर्यंत भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या शिवसेना आमदारांवर हल्ले करणारे, त्यांना ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा धाक दाखवून, ''आता तुमची जागा तुरुंगात'' असे बोलणाऱ्या किरीट सोमय्यांचे यापुढे कसे होणार ? हे सर्व आमदार कालपासून भाजपच्या गोटात शिरले आहेत आणि दिल्लीतील राजकीय गागाभट्टांनी त्यांना पवित्र, शुद्ध करून घेतले आहे. आता किरीट सोमय्यांना या सर्व शिवसेना आमदारांची पाद्यपूजा करावी लागेल असे दिसते, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

ते गरज संपताच पुन्हा कचऱ्यातच फेकून देतील

"शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. त्याचमुळे 'वेगळा गट' करून आसामात गेलेल्या लोकांना आमदार-नामदार होता आले. हे सर्व आमदार पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले तर जनता त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. याचे भान या मंडळींना नसेलच असे नाही. त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार व नामदार पुन्हा स्वगृही परत येतील. प्रवाहात सामील होतील. आज जे भाजपवाले त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहेत ते गरज संपताच पुन्हा कचऱ्यातच फेकून देतील. भाजपची परंपरा तर हीच आहे," असे अग्रलेखात म्हटलं आहे.

eknath shinde, Uddhav Thackeray
आघाडी सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न ; राष्ट्रवादीच्या आमदारांना आदेश

हे आता उघड झाले...

कोणी कितीही जोरबैठका मारत असले तरी वादळ सरेल व आकाश स्वच्छ होईल. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न कुणाला पडलेच असेल तर तो त्यांचा स्वप्नदोष. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीतील 'जादा' विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले. आता तर आमदारांना डांबून ठेवले आहे, असे टीकास्त्र भाजपवर करण्यात आले.

eknath shinde, Uddhav Thackeray
बंड यशस्वी : ठाकरेंकडे उरले १४ आमदार, शिंदेंना ४६ आमदार ६ अपक्षांचा पाठिंबा

इतकी पळापळ का सुरू आहे?

राजकारणात सगळेच अस्थिर असते आणि बहुमत त्याहून चंचल असते. शिवसेनेच्या तिकिटांवर, पैशांवर, मेहनतीवर निवडून आलेले आमदार भाजपच्या पकडीत फसले. ते आधी सुरतला आणि नंतर विशेष विमानाने आसामला गेले. या आमदारांची इतकी पळापळ का सुरू आहे? शिवसेनाअंतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत. त्याच्याशी आपला संबंध नाही वगैरे मखलाशी भाजपने तरी करू नये.

वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा,

जय-पराजय पचवले. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे 'माजी' होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा, असा सल्ला शिंदे गटाला देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in