Shivjayanti : शिवनेरीवर रंगले मानापमान नाट्य : संभाजीराजेंचा मंचावर येण्यास नकार, तर शिंदेनी समजूत काढली!

Shivjayanti : सामान्य शिवभक्तांना किल्ले शिवनेरीवर दर्शनासाठी रोखले...
Shivjayanti : Eknath Shinde : Chatrapati Sambhajiraje
Shivjayanti : Eknath Shinde : Chatrapati SambhajirajeSarkarnama

Shivjayanti : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाली. मात्र या दरम्यान किल्ले शिवनेरीवर शिवजयंती कार्यक्रमात मानापमान नाट्य पाहायला मिळाले. शिवभक्तांना शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेऊ देण्यास आडकाठी होत असल्याचा ते म्हणाले. शिवभक्तांची नाराजी त्यांनी बोलून दाखवत त्यांनी कार्यक्रमस्थळी जाण्यास नकार दर्शविला.

संभाजी छत्रपतींच्या (Chatrapati Sambhajiraje) नाराजीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: संभाजी छत्रपतींची मनधरणी करावी लागली. पण किल्ले शिवनेरीवर हा भेदभाव का? हा दुजाभाव कशासाठी? असा प्रश्न विचारत त्यांनी व्यासपीठावर जाण्याचे टाळले.

Shivjayanti : Eknath Shinde : Chatrapati Sambhajiraje
Dombivali News : धनुष्यबाण मिळताच शिंदे समर्थकांची बॅनरबाजी : 'विजय विचारांच्या वारशाचा..'

शिवजयंती सोहळ्यासाठी किल्ले शिवनेरीवर काही व्हिआयपींना पास देण्यात येऊन त्यांना सहज सोडण्यात आले. मात्र सामान्य शिवभक्तांना वर जाण्यापासून रोखण्यात आले, अशी तक्रार शिवभक्तांनी छत्रपती संभाजी यांच्याकडे बोलून दाखवली. हा प्रकार लक्षात येताच संभाजी छत्रपती प्रचंड संतापले याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यांनाचा थेट जाब मागवला.

किल्ले शिवनेरीवर भेदभाव होऊ नये. जोपर्यंत किल्ले शिवनेरीवर सामान्य शिवप्रेमींना वर जाऊ दिले जात नाही, तोपर्यंत मीही शिवनेरीवर जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका संभाजीराजे यांनी घेतली. यामुळे शिवनेरीवर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.

Shivjayanti : Eknath Shinde : Chatrapati Sambhajiraje
Supreme Court : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट : सर्वोच्च न्यायालयात २१ पासून सलग सुनावणी होणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in