Shivendraraje: धर्मवीर की स्वराज्यरक्षक वाद; शिवेंद्रराजेंनी राजकारण्यांना ठणकावलं ,म्हणाले...''

Hindu JanAakrosh News : संभाजी महाराजांचं वढू येथील समाधीस्थळ पर्यटन नाही तर तीर्थक्षेत्र जाहीर करावं..
Shivendraraje
Shivendraraje Sarkarnama

Shivendraraje on Ajit pawar Statement : सध्या धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल राजकारण सुरु आहे, हे नक्कीच दुर्दैवी आहे. आपण हे सहन करत राहिलो तर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आज केंद्रात मोदी जी आहेत, राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आहे आपल्या भावनांची कदर केली जाईल. तसेच संभाजी महाराज यांचे वढू येथे समाधी स्थळ पर्यटन क्षेत्र नाही तर तीर्थक्षेत्र जाहीर करावं ही मागणी करतो अशी मागणी भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी केली आहे.

पुण्यात हिंदू संघटनांच्या वतीने रविवारी (दि.२२) हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी दहा वाजता या मोर्चाला लालमहालापासून सुरुवात झाली आणि दुपारी डेक्कन भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला. या मोर्चात भाजप आमदार शिवेंदराजे भोसले (Shivendraraje Bhosale) हे देखील उपस्थित होते.

यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले, जाती, धर्म पंथ बाजूला ठेऊन एकत्र लढण्याची तयारी केली पाहिजे. अशीच आजच्या सारखी एकजूट मागण्या मान्य होईपर्यंत ठेवा. आम्ही कोणाच्याही विरोधात नाहीत पण 'हिंदू समाजात जे भीतीचं वातावरण झालंय, त्या भीतीला वाचा फोडण्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला आहे. प्रत्येक तालुका-शहरात हा मोर्चा काढला जात आहे.

Shivendraraje
Satyajeet Tambe News : सत्यजित तांबेंना काँग्रेस नेत्यांची पडद्याआडून ‘रसद’ : पाचही जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षकच होते असं विधान केलं होत. त्यानंतर राज्यात धर्मवीर की स्वराज्यरक्षक असा वाद उफाळून आला होता. आता यावर भाष्य करताना शिवेंद्रराजेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले, आतापर्यंत आपण जो इतिहास वाचला. त्यात छत्रपती संभाजी महाराजांची ओळख 'धर्मवीर' म्हणूनच इतिहासात केली गेली आहे, त्यामुळं यावरती चर्चा होऊ नये असं सांगत त्यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला आहे. तसेच सध्या धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल राजकारण सुरु आहे, हे नक्कीच दुर्दैवी असल्याची खंत बोलवून दाखवतानाच आपण हे सहन करत राहिलो तर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असंही शिवेंद्रराजे म्हणाले.

Shivendraraje
Maharashtra Political Crises : पक्षप्रमुख पदाचं काय होणार? अनिल परबांनी दिलं उत्तर

हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं तरी चालेल, पण देश आणि धर्माबाबत आता तडजोड नाही. आता आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय उरला नाही. लोकं म्हणतात, औरंगजेब सीमेचं रक्षण करायला आला होता. पण, हे वक्तव्य हास्यास्पद आहे. तो तिथं हिल स्टेशनला आला होता का? असा सवालही शिवेंद्रराजेंनी उपस्थित केला. फक्त राजकरण आणि नाव चर्चेत राहिला पाहिजे म्हणून असे वक्तव्य केले जात आहेत अशी टीकाही शिवेंद्रराजेंनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com