shivsena meeting
shivsena meetingSarkarnama

राष्ट्रवादीने छू म्हटले की, पोलिस शिवसैनिकांच्या पाठीमागे लागतात : आढळरावांची खंत

मुंबईप्रमाणे शिवसैनिकांनी प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करावी : ओमराजे निंबाळकर

शिरूर (जि. पुणे) : पोलिस आणि महसूल विभागाचे अधिकारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने (ncp) छू म्हटले की शिवसैनिकांच्या पाठिमागे लागतात. त्यांनी कायद्याचं नव्हे; तर काय द्यायचं राज्य चालवलय. पक्ष वाढविण्यासाठी राष्ट्रवादीकडून सरकारी तिजोरीची लयलूट चालू आहे. शिवसैनिकांना सन्मानाने जगू द्या. सहनशक्तीचा अंत झाला तर सरकारमधील सहकारी पक्ष का असेना त्यांच्याशी संघर्ष अटळ आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे (shivsena) उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला. (Shivajirao Adhalrao Patil's criticism on NCP and Home Department)

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत शिरूर येथे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसैनिकांचा मेळावा झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे होते. अध्यक्षस्थानवरून बोलताना आढळरावांनी वरील इशारा दिला.

shivsena meeting
किरीट सोमय्या हा फालतू कार्यकर्ता : श्रीरंग बारणेंचा हल्लाबोल

आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व गृहखात्यावर कडाडून टीका केली. राष्ट्रवादीला आम्ही घाबरत नाही पण त्यांच्या ताब्यात असलेल्या पोलिस खात्याकडून शिवसैनिकांना त्रास देण्याचा, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. पण, शिवसैनिकांनाही अन्याय सहन करण्याची सवय नाही, हे संबंधितांनी ध्यानात ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला.

shivsena meeting
संभाजीराजेंच्या पाठिंब्याबाबत थोरातांचा मोठा गौप्यस्फोट; 'मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती...'

प्रत्येक मतदार संघावर वर्चस्व गाजविण्याचे शिवसेनेचे ध्येय आहे, त्यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील संघटनात्मक कामाची शिवसैनिकांनी आस्थेवाईकपणे माहिती जाणून घ्यावी व पक्षाचे तसे मॉडेल आपापल्या मतदार संघात निर्माण करण्यासाठी मनापासून परिश्रम घ्यावेत, असे आवाहन शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले.

shivsena meeting
'संभाजीराजेंनी ती ऑफर स्वीकारली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती...'

ते म्हणाले, मतदान प्रक्रिया ही एका दिवसाची नव्हे; तर पाच वर्षांची प्रक्रिया आहे. हे समजून घेऊन मतदारांच्या सहज संपर्कात राहा. मुंबई महापालिका क्षेत्रातील शिवसैनिक तेच करतात; म्हणून तेथे २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. तेथील प्रत्येक शाखेने सामान्य माणसाच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. तसा विश्वास प्रत्येक शिवसैनिकाने सामान्य माणसाच्या मनात निर्माण करावा. विरोधकांबरोबरच राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या सहकारी पक्षांकडून शिवसैनिकांना येणाऱ्या अडचणींचा विषय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर मांडून सोडवणूकीसाठी प्रयत्न करू. मतदारांशी केवळ निवडणूकीपुरता नको तर सातत्यपूर्ण संपर्क ठेवा. त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी मनापासून प्रयत्न करा, असे आवाहन निंबाळकर यांनी केले.

shivsena meeting
आम्ही युतीसोबत होतो; म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला : जानकरांचे फडणवीसांना उत्तर

मेळाव्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, नगरसेविका अंजली थोरात, शिवसेनेचे जिल्हा संघटक संजय देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक श्रद्धा कदम, सहसंघटक विजया टेमगिरे, जिल्हा सल्लागार अनिल काशीद, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, आंबेगाव - शिरूरचे प्रमुख गणेश जामदार, उपतालुकाप्रमुख अनिल पवार आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचे शहर प्रमुख मयुर थोरात यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तालुका प्रमुख सुधीर फराटे यांनी प्रास्तविक केले. युवासेनेचे शहर अधिकारी सुनिल जाधव यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com