"हिंदुजननायक कोणाची खासगी मालमत्ता नाही": आढळराव-पाटलांनी मनसेला ठणकावले

Shivajirao Adhalrao Patil | Shivsena : शिवसेनेकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदूजननायक उपाधी
Shivajirao Adhalravada Patil
Shivajirao Adhalravada Patilsarkarnama

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मागील काही काळापासून हिंदुत्वाकडे झुकणारी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यात मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा अन् हनुमान चालीसा आंदोलन, महाआरती, अयोध्या दौरा अशा गोष्टींचा समावेश आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी त्यांना हिंदूजननायक ही उपाधी दिली आहे. त्यानंतर आता शिवसेनेकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना हिंदूजननायक ही उपाधी देण्यात आली आहे. (CM Uddhav Thackeray Latest Marathi News)

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) व माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून उद्धव ठाकरेंना हिंदूजननायक म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंची येत्या 14 मे रोजी मुंबईच्या बीकेसी मैदानात सभा होणार आहे. या सभेबाबत या नेत्यांनी बॅनर तयार केले असून त्यावर ठाकरेंना हिंदूजननायक ही उपाधी दिली आहे. (MNS Raj Thackeray Latest Marathi News)

शिवसेना नेत्यांच्या या बॅनरवाजीवरून पुन्हा एकदा शिवसेना व मनसे आमनेसामने आले आहेत. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या या उपाधीवरुन शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले, राज ठाकरे अयोध्येला निघाले की यांचा दौरा जाहीर, राज ठाकरेंनी सभा घेतली की हे पण सभा करणार, हे मनसेचे नगरसेवक चोरणार, हे मनसेचे सभेच्या गर्दीचे फोटो चोरणार, आता तर कहर! 'हिंदूजननायक' ही पदवी पण चोरत आहेत! स्वतःचं काहीतरी 'असली' करणार का नाही? असा सवाल त्यांनी विचारला.

या टीकेनंतर आढळराव पाटील यांनी "हिंदुजननायक कोणाची खासगी मालमत्ता नाही" असे सांगत मनसेला ठणकावले आहे. ते म्हणाले, हिंदुजननायक कोण यावरुन शिवसेना आणि मनसे सामना रंगलाय. पण बाळासाहेब ठाकरेंचे विचार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे घेऊन चाललेत म्हणुन आमचे पक्षप्रमुख हिंदुजननायक आहे आणि रहाणार..! हिंदुजननायक हि काय कोणाची मालमत्ता नाही आणि आम्ही कोणाच्या धमक्यांना भीक घालत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com