छाटछूट हल्ल्याला आम्ही घाबरत नाही; करारा जवाब मिलेगा : सावंतांकडून शिवसेनेला प्रत्युतर

शिवसैनिकांनी पुण्यातील कार्यालय फोडल्यानंतर आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाकडून हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
Giriraj Sawant
Giriraj SawantSarkarnama

पुणे : बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे पुण्याच्या (pune) कात्रज परिसरातील कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी (shivsena) फोडले. त्यावर सावंत गटाकडून तातडीने प्रतिक्रिया आली असून अशा छाटछूट हल्ल्याला आम्ही घाबरत नाही, करारा जवाब मिलेगा, अशा शब्दांत आमदार सावंत यांचे चिरंजीव गिरीराज सावंत यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. (Shiv Sena's attack will be answered in due course : Tanaji Sawant's son responds)

गिरीराज सावंत यांनी आपल्या फेसबुक स्टेट्सवर एक पोस्ट करत शिवसैनिकांकडून कार्यालय फोडण्यात आल्यानंतर शिवसेनेला इशारा दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आमचे नेते प्रा. तानाजीराव सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर जो भ्याड हल्ला झाला. त्याला योग्य वेळी उत्तर दिले जाईल. अशा छाटछूट आणि भेकड हल्ल्याला आम्ही घाबरत नाही. करारा जवाब मिलेगा, असा इशारा गिरीराज सावंत यांनी फेसबुक स्टेट्‌सद्वारे दिला आहे.

Giriraj Sawant
‘तानाजी सावंत कळीचे नारद, ते शिवसैनिक नाहीत’ : शिवसैनिकांनी पुण्यातील कार्यालय फोडले

दरम्यान, संतप्त शिवसैनिकांनी आज दुपारी आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय फोडले. सावंत यांच्याविषयी अत्यंत संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. कार्यालय फोडल्यानंतर शिवसैनिकांनी त्या ठिकाणी सावंत गद्दार आहेत, अशी वाक्येही लिहिली आहेत. तानाजी सावंत कळीचे नारद असून ते खरे शिवसैनिक नाहीत, असा रोष पुण्यातील शिवसैनिकांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केला. सध्याच्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्यामध्ये आमदार तानाजी सावंत यांचा मुख्य रोल आहे, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी केला.

giriraj sawant
giriraj sawantSarkarnama

आमदार तानाजी सावंत यांच्या आंबेगाव बुद्रुक येथील कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी ही तोडफोड केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुक्रवारी झालेल्या पदाधिकारी बैठकीनंतर पुण्यातील शिवसैनिकांनी अखेर सावंत यांना ठाकरी बाणा दाखविला आहे. राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. प्रारंभी कोल्हापूर आणि त्यानंतर माहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्याचे पडसाद शनिवारी सकाळी पुण्यातही उमटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com