आमदार सावंतांच्या पुण्यातील शिक्षण संस्थेच्या कार्यालयाबाहेर शिवसेनेचे आंदोलन

सावंत (Tanaji Savant) गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना नेतृत्वावर नाराज होते.
आमदार सावंतांच्या पुण्यातील शिक्षण संस्थेच्या कार्यालयाबाहेर शिवसेनेचे आंदोलन
Shivsena Mla Tanaji SawantSarkarnama

पुणे : शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहाटी येथे असलेले माजी मंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Savant) यांच्या पुण्यातील शिक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर पुण्यातल्या शिवसैनिकांनी आज जोरदार आंदोलन केले.

Shivsena Mla Tanaji Sawant
सोमय्यांच्या 'डर्टी डझन'मधील दोन आमदार भाजपला चालतील का?

गद्दारांना क्षमा नाही. शिवसेना जिंदाबाद. उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी करीत सावंत यांच्या कात्रज येथील ‘जेएसपीएम’ या शिक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. आमदार सावंत उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम -परंडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. उस्मानाबाद आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांचे संपर्क मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेच्या वतीने त्यांनी जलसंधारण मंत्री म्हणूनदेखील जबाबदारी सांभाळली होती.

Shivsena Mla Tanaji Sawant
नितीन देशमुखांचा `गनिमी कावा` फसवा.. शिंदेंनी त्यांना चार्टर्ड विमानाने पाठविले..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अनेक प्रयत्न करूनदेखील सावंत यांना स्थान मिळू शकले नाही. गेल्या दोन-अडीच वर्षापासून ते नाराज होते. मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात यावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.मात्र, शिवसेना नेतृत्वाने त्यांना मंत्रीमंडळात सामावून घेतले नाही.त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते नाराज होते.मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाची तयारी केल्यानंतर सुरवातीपासून आमदार सावंत त्यांच्या सोबत आहेत. मुंबईवरून सूरत आणि त्यानंतर सुरतहून गुवाहाटी येथे जाणाऱ्या पहिल्या तुकडीत सावंत यांचा सहभाग होता.

आमदार सावंत यांचा शिक्षण संस्था समूह मोठा आहे. पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच अभियांत्रिकीसह विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये आहेत. याशिवाय खासगी साखर कारखाने आहेत. साखर कारखानदारीच्या क्षेत्रात सावंत यांचे मोठे नाव आहे. सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात त्यांचे सुमारे चार ते पाच खासगी सहकारी साखर कारखाने आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात आपल्याला सहभागी करून घेण्यात यावे यासाठी सावंत यांनी विविध मार्गांनी प्रयत्न केले. मात्र, गेल्या दोन-अडीच वर्षात त्यांच्या या प्रयत्नांना यश आले नव्हते. त्यामुळे सावंत गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना नेतृत्वावर नाराज होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in