शिंदेच्या समर्थनार्थ पिंपरीतही बॅनर; शिवसैनिकांनी ते लगेच काढले अन् तुडविले

Eknath Shinde Latest Marathi News : शिवसेना कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलन केले आहे
Eknath Shinde Latest Marathi News
Eknath Shinde Latest Marathi Newssarkarnama

पिंपरी : यापूर्वी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात 'शिवडे' आय एम सॉरी' सारख्या लागलेल्या रहस्यसमय बॅनरची जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर काल मध्यरात्रीनंतर शहरात तीन मुख्य चौकांत बंडखोर शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) समर्थनार्थ लागलेल्या निनावी बॅनर्सनी सकाळी काही तास मोठा धुरळा उडवून दिला. मात्र, त्याबाबत समजताच हे तिन्ही बॅनर शिवसैनिकांनी काढले, फाडले आणि तुडविले. त्यावरील शिंदेंच्या फोटोला त्यांनी जोडे मारून आपला संतापही व्यक्त केला. (Eknath Shinde Latest Marathi News)

आम्ही एकनाथ शिंदे साहेब समर्थक असा ठळक अक्षरातील मजकूर शिंदे यांच्या फोटोसह या बॅनरवर होता. मात्र, शहरात एकही शिंदेसमर्थक नसताना ते लागल्याने हा भाजपचा (BJP) खोडसाळपणा असल्याचा आरोप त्यांचे नाव न घेता ते काढणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याने केला. शिवसेनेचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांचा रोखही त्या दिशेनेच असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून जाणवले. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पिंपरी चौक), अहिल्यादेवी होळकर चौक (मोरवाडी चौक) आणि महावीर चौक (चिंचवडस्टेशन चौक) येथे काल रात्री उशीरा हे बॅनर मेट्रोच्या पिलरवर लावण्यात आले. मोठ्या वर्दळीच्या चौकातच ते झळकल्याने सकाळी त्याची जोरदार चर्चा सुरु झाली. दुसरीकडे शिवसेनेचे शहरप्रमुख वारीला गेलेले आहेत.

Eknath Shinde Latest Marathi News
देवेंद्र फडणवीस ७ दिवसांमध्ये पाचव्यांदा दिल्लीत : शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानीही सोबत

त्यामुळे याबाबत समजताच शिवसेनेचे चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे व त्यांचे सहकारी लगेचच धावले. त्यांनी तिन्ही चौकांतील बॅनर काढले, फाडले, तुडविले अन् त्यावरील शिंदेच्या फोटोला जोडेही मारले. एवढेच नाही, तर संपूर्ण शहरात फिरून त्यांनी इतरत्र असे बॅनर लागले आहेत का नाही याची खात्रीही केली. शहरात एकही शिंदे समर्थक नसल्याचे कोऱ्हाळे यांनी 'सरकारनामा' ला सांगितले. त्यामुळे हा खोडसाळपणा असल्याचे सांगत ते कुणी लावलेत हे सांगायची गरज नाही, असे ते म्हणाले. शहप्रमुखांनीही हा विरोधकांचा खोडसाळपणा असल्याचे सांगितले.

Eknath Shinde Latest Marathi News
उद्धव ठाकरेंच्या भोवतीचे बडवे कोण; बंडखोरांचा या नेत्यांवर निशाणा

शहराचे प्रतिनिधीत्व करणारे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे पक्षातील बंडानंतर मुंबईतील पक्षाच्या प्रत्येक बैठकीला हजेरी लावत आहेत. पक्ष व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. शहरातील शिवसेनेचे माजी आमदार पिंपरीचे अॅड. गौतम चाबूकस्वार यांनीही अशीच भुमिका घेतलेली आहे. संपूर्ण शहर पक्ष व पक्षप्रमुखांच्या पाठीशी असल्याचे शहरप्रमुखांनीही सांगितलेले आहे. शहरात एकही शिंदे समर्थक नसल्याचा त्यांचा दावा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in