ते कोश्यारी नसून महाराष्ट्रासाठी विषारी आहेत : शिवसेना नेत्याची जहाल टीका

कोश्यारींनी माफी न मागितल्यास शिवसेना काढणार शिवनेरी ते राज्यपाल भवन अशी निषेध मशाल रॅली
Shiv Sena
Shiv SenaSarkarnama

मंचर (जि. पुणे) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे सतत वादग्रस्त विधाने करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा व महाराष्ट्राचा ते जाणीवपूर्वक अवमान करत आहेत. ते कोश्यारी नाहीत, तर महाराष्ट्रासाठी विषारी आहेत. अशा व्यक्तीला भाजप सरकारकडून मिळत असलेले समर्थन दुर्दैवी आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल केला. (If Koshyari does not apologize, Shiv Sena will take out a protest torch rally from Shivneri to Governor Bhavan)

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे सोमवारी (ता. २१ नोव्हेंबर) छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध व कोश्यारी यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन भोर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक ॲड.अविनाश राहणे, माजी आदर्श सरपंच दत्ता गांजाळे, गोविंद काळे, शिवराज भोर, अरुण बाणखेले, सुवर्णा डोंगरे, सोनाली पांचाळ, विजय शेटे, सूरज हिंगे, विवेक पिंगळे, उपस्थित होते.

Shiv Sena
आमदारकीसाठी इच्छूक अभिजित पाटलांनी ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाण्यावर धरला ठेका!

भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी न मागितल्यास लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी (ता. जुन्नर) ते राज्यपाल भवन (मुंबई) अशी मशाल रॅली काढून त्यांना जाब विचारावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी दिला आहे.

Shiv Sena
‘अशोक पवारांच्या होमपिचवर दादा पाटलांना आमदारांपेक्षा अधिक मते’
Shiv Sena
पवारसमर्थकांना धक्का : हायकोर्टाने 'तो' ठराव फेटाळला; विरोधक म्हणतात ‘माजी उपमुख्यमंत्र्यांचा कुटील डाव संपवला’

या वेळी राहणे यांनी राज्यपाल कोश्यारी व स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. या वेळी तालुका प्रमुख दिलीप पवळे, महिला आघाडी तालुका प्रमुख कलावती पोटकुले, प्रवीण टेमकर, प्रसन्न लोखंडे यांची भाषणे झाली. रवींद्र म्हस्के यांनी सूत्रसंचालन, तर उमेश पांचाळ यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in