राष्ट्रवादीच्या मागे फरफट नको; आघाडी सन्मानाने व्हावी!

राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) व शिवसेनेमध्ये (shivsena) आघाडीच्या दृष्टीने एक बैठक सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेली होती.
Shivsena-NCP
Shivsena-NCPSarkarnama

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Pune Municipal Election) प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने प्रत्येक प्रभागातील शिवसैनिकांची मते जाणून घेऊन तेथील पक्षाची शक्ती आजमविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणूक स्वबळावर लढावी अशी भूमिका काही शिवसैनिकांनी मांडली आहे. तर नगरसेवकांची संख्या वाढविण्यासाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करावी पण सन्मानाने करावी, अशी मतेही व्यक्त केली आहेत. राज्यात आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आहे. मात्र, पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हे तीन पक्ष एकत्र लढतील की नाही हे स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp)शिवसेनेमध्ये (shivsena) आघाडीच्या दृष्टीने एक बैठक सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेली होती.

त्यानंतर त्यामध्ये फार काही घडले नाही. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रभागरचना आमच्यासाठी पोषक असून १२२ नगरसेवक स्वबळावर निवडून येतील त्यामुळे आघाडी नको अशी भूमिका मांडली. यानंतर शिवसेनेने देखील सावध भूमिका घेऊन बैठका सुरू केल्या आहेत. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्या उपस्थितीमध्ये प्रभागनिहाय बैठका सुरू आहेत.

Shivsena-NCP
शेळकेंवर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी : जगताप, तापकीर, थोरवेंच्या पराभवासाठी आखणार डावपेच!

नव्या प्रभागरचनेत शिवसेनेसाठी फायदेशीर ठरणारा भाग कोणता आहे, नव्याने आलेला भाग कोणता, शिवसेनेच्या हक्काचा मतदारांची विभागणी कोणत्या भागात झाली आहे. इतर पक्षांची स्थिती काय आहे? ही माहिती संकलित केली जात आहे. त्याचवेळी काही शिवसैनिकांनी स्पष्टपणे स्वबळावर लढावे असे सांगितले आहे. तर काहींना आघाडी करावी, मात्र जागा वाटप करताना शिवसेनेची फरफट होऊ नये, सन्मानपूर्वक जागा मिळाल्या पाहिजेत असे मत मांडले आहे. आत्तापर्यंत पर्वती, हडपसर, वडगावशेरी, कोथरूड, शिवाजीनगर, कसबा या मतदारसंघातील पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांशी चर्चा झाली आहे, रविवारी आम्हाला बोलावले आहे, असे शिवसैनिकांनी सांगितले.

Shivsena-NCP
आव्हाड यांचा मोठा संकल्प की ज्यामुळे एकनाथ शिंदेंना हायसे वाटणार!

''प्रभागरचनेनंतर प्रत्येक प्रभागातील शिवसैनिकांची मते जाणून घेतली आहे. ५८ पैकी ४० प्रभागांबद्दल चर्चा झाली आहे. खडकवासला, कॅन्टोन्मेंट आणि पुरंदरचा मतदारसंघातील २० प्रभागांची बैठक पुढील दोन दिवसात होतील. त्यानंतर पुण्यातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करून त्याचा अहवाल मुंबईला वरिष्ठांकडे पाठवला जाईल. काहींनी आघाडी करावी व काहींना स्वबळावर लढावे असे सांगितले. मात्र, त्याबाबत निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील, असे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in