पुण्यात शिवसेनेला धक्का : कट्टर पदाधिकाऱ्याने धरली एकनाथ शिंदे गटाची वाट!

पुण्यात शिवसेनेत फूट : कट्टर पदाधिकारी राजाभाऊ भिलारे हे एकनाथ शिंदे गटात सामील
Rajabhau Bhilare
Rajabhau BhilareSarkarnama

पुणे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाचे लाेण आता पक्षसंघटनेतही हळूहळू पसरू लागले आहे. आमदारांनंतर आता पदाधिकाऱ्यांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे. त्यातूनच पुणे (Pune) शहरातील शिवसेनेमध्ये (shivsena) फूट पडली आहे. शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेले राजाभाऊ भिलारे यांनी काही वेळा पूर्वी शिवसेना सोडून एकनाथ शिंदे गटात सहभागी होत असल्याचे जाहीर केले आहे. (Shiv Sena split in Pune : Rajabhau Bhilare, staunch office bearer, joins Eknath Shinde's group)

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना आक्रमक झाली असून शिंदे यांच्या गोटात सामील झालेल्या आमदारांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच शिंदे हे चालवत असलेल्या वैद्यकीय समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ भिलारे यांच्या कार्यालयात घुसून शिंदे यांच्या छायात्रिचाला काळे फासले. त्यानंतर भिलारे यांनी वरील निर्णय घेतला आहे.

Rajabhau Bhilare
मोठी बातमी : शिवसेना एकनाथ शिंदेंची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करणार?

आडमुठ्या शिवसैनिकांमुळे मला शिवसेना सोडावी लागत असल्याचा दावा राजाभाऊ भिलारे यांनी केला आहे. राजाभाऊ भिलारे हे बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे चालवत असलेल्या वैद्यकीय समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. पुणे शहरातील काही शिवसैनिकांनी काही वेळापूर्वी राजाभाऊ भिलारे यांच्या कार्यालयात घुसून एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्राला काळ फासल होते. निष्ठावंत शिवसैनिक असूनदेखील काही शिवसैनिकांनी माझ्या कार्याला घुसन आंदोलन केले याची मला खंत आहे, अस सांगत राजाभाऊ भिलारे यांनी शिवसेना सोडल्याचे जाहीर केले आहे.

Rajabhau Bhilare
छाटछूट हल्ल्याला आम्ही घाबरत नाही; करारा जवाब मिलेगा : सावंतांकडून शिवसेनेला प्रत्युतर

उद्वव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी अजूनही आपले निर्णय जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे शिवसैनिकांचा उतावीळपणे का चालेले आहे, हे मला समजत नाही. जे लोक माझ्या कार्यालयात आले हेाते. त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. मागील निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या विरोधात काम केले हेाते. शिवसेनेच्या विरोधात त्यांनी बंडखोरी केली हेाती. ते आज बंडखोरीबाबत सांगत आहे. असं कुणीही येऊन आमच्यावर हल्ला करत असल तर ते योग्य नाही. आम्हाला एकनाथ शिंदे यांनी संरक्षण दिलेले आहे, त्यामुळे आम्ही शिंदे समर्थक म्हणून जाहीर करत आहे. आजपासून आम्ही एकनाथ शिंदे गटात सामील झालेलो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com