दिलीप मोहितेंचा शिवसेनेला दुसरा दणका : राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सेनेचे बंडखोर बनले उपसभापती

खेडमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पुन्हा रंगला
दिलीप मोहितेंचा शिवसेनेला दुसरा दणका : राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सेनेचे बंडखोर बनले उपसभापती
amar kambleSarkarnama

राजगुरुनगर (जि. पुणे) : खेड पंचायत समितीच्या सभापतिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात ‘हाय व्होलटेज ड्रामा’ रंगला होता. त्यावेळी शिवसेनेच्या सभापतीविरुद्ध शिवसेनेच्याच पंचायत समिती सदस्यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याचा दुसरा अंक आज पुन्हा खेडमध्ये पहायला मिळाला. पंचायत समितीच्या उपसभापतिपदासाठी शिवसेना विरुद्ध शिवसेना असे दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यात राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे बंडखोर सदस्य अमर कांबळे हे विजयी झाले. त्यांना दहा मते मिळाली, तर विरोधातील शिवसेनेच्या दुसऱ्या गटाचे उमेदवार मच्छिंद्र गावडेंना अवघी दोन मते मिळाल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. (Shiv Sena rebel Amar Kamble wins Khed Panchayat Samiti vice-chairman election)

दरम्यान, खेडमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पुन्हा रंगला. त्यात शिवसेनेच्या बंडखोराला विजयी करत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी शिवसेनेला पुन्हा दणका दिल्याची चर्चा रंगली आहे. त्यांनी पंचायत समितीमधील शिवसेनेची संपूर्ण सत्ता उलथवून टाकली आहे.

खेड पंचायत समितीत शिवसेनेचे बहुमत असूनही पक्षाचे तत्कालीन सभापती भगवान पोखरकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. त्यानंतर हाणामारी व गोळीबाराची घटना घडली होती. त्याप्रकरणी पोखरकरांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राजगुरुनगरमध्ये येऊन राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. खेड पंचायत समितीत शिवसेनेचे माजी सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव दोनवेळा मंजूर होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी यांची वर्णी लागली होती.

amar kamble
‘मला मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते...’ फडणवीसांच्या या विधानावर पंकजा म्हणाल्या...

खेडचे मावळते उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. शिवेकर हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर उपसभापती झाले होते. खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात उपसभापती निवडीसाठी आज पंचायत समिती सदस्यांची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण पीठासीन अधिकारी होते. त्यांच्याकडे शिवसेनेचे मच्छिंद्र गावडे आणि शिवसेनेचे बंडखोर अमर कांबळे यांनी उपसभापती पदासाठी आपापले अर्ज दाखल केले.

amar kamble
हर्षवर्धन पाटलांनी बाजी मारली; कर्मयोगी कारखान्याची निवडणूक बिनविरोध !

पंचायत समितीचे १२ सदस्य दुपारी तीन वाजता सभागृहात हजर झाले. भगवान पोखरकर आणि अमोल पवार हे अनुपस्थित होते. मतदान झाल्यावर कांबळे यांना १० व गावडे यांना २ मते मिळाल्याने उपसभापतीपदी कांबळे यांची निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी चव्हाण यांनी घोषित केले. राष्ट्रवादीचे सभापती अरुण चौधरी, सदस्य मंदा शिंदे, नंदा सुकाळे, वैशाली गव्हाणे, भाजपचे चांगदेव शिवेकर आणि शिवसेनेचे बंडखोर अंकुश राक्षे, सुभद्रा शिंदे, वैशाली जाधव, सुनीता सांडभोर यांनी नूतन उपसभापती कांबळे यांचा सत्कार केला.

Related Stories

No stories found.