खासदार बारणेंचा शिवसेनेला धक्का; मावळातील पदाधिकारी शिंदे गटात

मावळचे शिवसेना (ShivSena) खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हे नुकतेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेले आहेत.
Srirang Barane Latest Marathi News
Srirang Barane Latest Marathi Newssarkarnama

पिंपरी : मावळचे शिवसेना (ShivSena) खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हे नुकतेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेले आहेत. त्यानंतर मावळात शिवसेनेच्या पडझडीस आता सुरवात झाली आहे. शिवसेनेचे मावळ तालुकाप्रमुख राज खांडभोर व काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काल शिंदे गटाची वाट धरली. मात्र, आपण शिवसेनेतेच असल्याचे खांडभोर यांनी आज सरकारनामाला सांगितले. दरम्यान, मावळसह पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) आणखी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात जाण्याचे संकेत मिळाले आहेत. येत्या आठ दहा दिवसांत `देखो, होता है,क्या`,असे सूचक वक्तव्य बारणे गटातून आज करण्यात आले आहे. (Srirang Barane Latest Marathi News)

पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधीत्व करणारे बारणे हे अचानक यू टर्न घेत शिंदे गटात गेल्याने सर्वांनाच धक्का बसला. मात्र, त्यानंतरही निम्मा घाटावर (तीन विधानसभा मतदारसंघ) आणि तेवढाच घाटाखाली असलेल्या मावळ मतदारसंघातील शिवसेनेमध्ये शांतता होती. पिंपरी-चिंचवडही त्याला अपवाद नव्हते. तेथील पदाधिकारी व कार्यकर्ते `वेट अॅन्ड वॉच`च्याच भुमिकेत होते व आहेत.

Srirang Barane Latest Marathi News
आदित्य ठाकरेंनी हात उंचावला अन् शिर्डीत शिवसेनेचा लोकसभेचा उमेदवार ठरला?

मात्र, दोन दिवसांपूर्वी (ता.२२) दिल्लीहून मतदारसंघात (घरी पिंपरी-चिंचवडला) आलेल्या बारणेंचे जोरदार स्वागत झाले अन त्यानंतर चित्र हळूहळू बदलू लागले आहे. काल थेरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी मावळ तालुका शिवसेनाप्रमुख खांडभोर आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते भेटायला आले. त्यावेळी अप्पांनी (बारणे) आपण का शिंदे गटात गेलो, हे त्यांना सांगितले. ते त्यांना पटले. त्यामुळे त्यांनीही अप्पांबरोबर जाण्याचे ठरवले. अप्पांची भुमिका पटल्याने त्यांच्यासोबत राहण्याचे, जाण्याचे ठरवले, विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर हा निर्णय घेतल्याचे खांडभोर म्हणाले. गेल्या अडीच वर्षात न झालेला विकास आता करण्याचे आश्वासन खासदार अप्पांनी दिल्याचे त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

Srirang Barane Latest Marathi News
खासदार जाधवांना शिवसेनेचा दणका; ठाकरेंनी केली हकालपट्टी

दरम्यान, बारणे यांच्या निर्णयावर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मावळ तालुक्यातील लोणावळा येथील मच्छिंद्र खराडे यांनी सडकून टीका केली. बांडगूळ व डोमकावळा असा बारणेंचा उल्लेख त्यांनी केला. शरद पवार आणि स्व. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्याशीही बारणेंनी गद्दारी केली होती, याची आठवण त्यांनी करून दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in