कालपर्यंत ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले बारणे आज शिंदेंच्या गोटात

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेनेच्या १२ खासदारांनी पाठिंबा दिला आहे
Srirang Barane Latest Marathi News
Srirang Barane Latest Marathi Newssarkarnama

पिंपरी : शिवसेनेत (ShivSena) बंड करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबईतील एका पंचताराकिंत हॉटेलात आपल्या समर्थक आमदारांच्या आज (ता.१८) घेतलेल्या बैठकीला शिवसेनेच्या लोकसभेतील १९ पैकी १२ खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती लावून त्यांना समर्थन दिले. त्यात पुणे जिल्यातील मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांचा समावेश आहे. तर, शिरूरचे माजी खासदार आणि शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) यांनी, तर प्रत्यक्ष या बैठकीला उपस्थित राहून शिंदेंना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे पुणे जिल्ह्यात दुहेरी कोंडी होऊन शिवसेनेला मोठा सुरुंग लागला आहे. (Srirang Barane Latest Marathi News)

कालपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि 'मातोश्री'शी एकनिष्ठ असलेल्या बारणेंनी आज अचानक एकदम `यू टर्न`घेतल्याने मावळच नाही, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे हकालपट्टीच्या नाट्याने प्रचंड दुखावलेले आढळराव यांचे शिंदे गटात सामील होणे तेवढे धक्कादायक समजले जात नाही. मात्र, २०२४ ला पुन्हा खासदार होण्यासाठी आपले राजकीय भवितव्य विचारात घेऊन बारणे यांनी शिंदे गटाशी हातमिळवणी केल्याचे समजते. दरम्यान, कालच संसदेच्या अधिवेनासाठी ते दिल्लीला गेले आहेत. एरव्ही नेहमी सुरु असलेला त्यांचा मोबाईल फोन आज आतापर्यंत मात्र प्रथमच आश्चर्यकारकरित्या बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी अचानक भूमिका का बदलली हे त्यांच्याकडून कळू शकले नाही.

Srirang Barane Latest Marathi News
Satara : शिवसेनेला खिंडार; 700 शिवसैनिक शिंदे गटामध्ये सामील... पुरुषोत्तम जाधव

२०१४ आणि २०१९ ला मोदी लाटेमुळे बारणे हे सलग दुसऱ्यांदा मावळमधून खासदार झाले आहेत. आगामी लोकसभेला मात्र भाजपबरोबर शिवसेनेशी युती नसणार हे २०१९ ला शिवसेना दोन्ही कॉंग्रेसबरोबर आघाडी करून राज्यात सत्तेत आली तेव्हाच स्पष्ट झाले होते. शिंदे यांचे बंड झाले नसते, तर त्या परिस्थितीत बारणे यांना मावळातून शिवसेनेकडून हॅटट्रिक करणे २०२४ ला खूपच अवघड होणार होते. त्याचाच विचार करून शिंदे गटात ते सामील झाल्याचे कळते. विद्यमान खासदारांनाच तिकिट या धोरणानुसार त्यांनाच पुन्हा २०२४ ला लोकसभेची उमेदवारी आता मिळू शकते. तसेच भाजपशी शिंदे गटाची युती असल्याने विजयही सोपा होईल, अशी अटकळ बांधून बारणेंनी शिंदे गटाला समर्थन दिल्याचे समजते. दुसरीकडे अशीच स्थिती शिरूरमध्ये असणार आहे. तेथेही विद्यमान खासदार राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध आता तेथील तीन टर्मचे माजी खासदार आढळराव असा सामना २०२४ ला रंगेल, अशीच चिन्हे दिसत आहेत.

Srirang Barane Latest Marathi News
राष्ट्रवादीचा प्रचार करण्यास सांगितल्याचे न पटल्यानेच शिवसेना सोडली : आढळराव

दरम्यान, शिवसेनेच्या या आजी, माजी खासदारांच्या (बारणे, आढळराव) पावित्र्यामुळे पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा सुरुंग लागला आहे. दरम्यान, या आजी, माजी खासदारानंतर त्यांचे समर्थक पदाधिकारी व कार्यकर्तेही शिंदे गटात जाण्याचे संकेत आजच मिळाले. आढळराव यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील आजी, माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उद्या (ता.१९) सकाळी दहा वाजता लांडेवाडी (ता.मंचर, जि. पुणे) येथील आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. त्यात पुढील दिशा ठरवणार असल्याचे आढळराव यांनी थोड्या वेळापूर्वी `सरकारनामा`ला सांगितले. म्हणजे त्यांच्यानंतर त्यांचे समर्थक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्तेही शिंदे गटात सामील होणार हे उद्या जाहीर होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com