rajya sabha : मत बाद ठरविल्याने शिवसेनेचे सुहास कांदे उच्च न्यायालयात जाणार

सुहास कांदे यांनी आज पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अनिल अंतुरकर यांची भेट घेतली आहे.
MLA Suhas Kande
MLA Suhas KandeSarkarnama

पुणे : राज्यसभा निवडणुकीत (rajya sabha election) शिवसेनेचे (shiv sena)आमदार सुहास कांदे (suhas kande) यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरविले आहे. आपल्या मतदान हक्काविषयी सुहास कांदे हे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागायला जाणार आहेत.

या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरवल्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सुहास कांदे कायदेशीर लढा देणार आहेत, असे शनिवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते.

सुहास कांदे यांनी आज पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अनिल अंतुरकर यांची भेट घेतली आहे. अनिल अंतूरकर यांचा सल्ला घेऊन सुहास कांदे हे उद्या (ता.१३) मुंबई उच्च न्यायालयात आपल्या मतदान हक्काविषयी दाद मागणार आहेत.

MLA Suhas Kande
शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंनी बोध घ्यावा ; राणेंचा खोचक सल्ला

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर तसेच शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्याची मागणी भाजपाने केली होती. तर महाविकास आघाडीने भाजपाचे सुधीर मुनगंटीवार तसेच अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला.

MLA Suhas Kande
आघाडीची मतं फुटली नाहीत, फडणवीसांनी विविध मार्गांनी माणसं वळवली : शरद पवार

शुक्रवारी राज्यसभा निवडणुकी दरम्यान भाजप आमदार नितेश राणे हे पोलिंग एजंटची भूमिका बजावत होते. यावेळी नितेश राणे यांना सुहास कांदे यांनी मतदान करताना नियमांचे उल्लंघन केल्याचे जाणवले. त्यांनी ही बाब आमदार आशिष शेलार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर नितेश राणे आणि आशिष शेलार यांनी सुहास कांदे यांच्या मतावर आक्षेप घेत हे मत बाद करण्याची मागणी केली होती.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, भाजपचे सुधीर मुनगंटीवार, अपक्ष रवी राणा यांची मते वैद्य ठरवलीत तर शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com