...तर शिवसेनेला ZP, पंचायत समितीत उमेदवार मिळणे मुश्कील होईल : शिवसैनिकांची व्यथा

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हाला त्रास दिला जातोय : शिवसैनिकांनी व्यक्त केली खदखद
shivsena meeting
shivsena meetingSarkarnama

पारगाव (जि. पुणे) : शिवसंपर्क अभियान अंतर्गत आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील पारगाव-अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटात पारगाव आणि लोणी येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. त्यात राज्यात जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार असले तरी स्थानिक स्तरावर सर्वसामान्य शिवसैनिकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) त्रासाला सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे पक्षाने तळागाळातील शिवसैनिकांना खऱ्या अर्थाने ताकद दिली, तरच ग्रामीण भागात शिवसेना (shivsena) टिकेल;अन्यथा पंचायत समिती व जिल्हा परिषदेला उमेदवार मिळणे मुश्कील होईल,’ अशी व्यथा शिवसैनिकांनी पक्ष निरीक्षकांपुढे मांडली. (Shiv Sainiks are being harassed by NCP)

संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्यांतर्गत पारगाव-अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटात पारगाव पंचायत समिती गणातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पारगाव येथे, तर अवसरी बुद्रुक गणातील मेळावा लोणी येथे झाला. त्या मेळाव्यात शिवसैनिकांनी मनातील खदखद व्यक्त केली. मेळाव्याला पक्ष निरीक्षक म्हणून संजय वडाळ व बाळकृष्ण मेंगे उपस्थित होते.

shivsena meeting
'संभाजीराजे अन्‌ शिवसेनेतील हा विषय; इतरांनी त्यात चोमडेपणा करू नये'

रवींद्र करंजखेले म्हणाले की, राज्यात सत्तेत असलेल्या ठाकरे सरकारच्या माध्यमातून विकास कामांसाठी मोठा निधी येत आहे. मात्र, राज्य सरकारकडून शौचालय जरी मंजूर झाले तरी राष्ट्रवादी त्याचे एकट्याचेच श्रेय असल्याचे भासवून त्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक स्तरावर सर्वसामान्य शिवसैनिकाला राष्ट्रवादीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पक्षाने तळागाळातील शिवसैनिकांना खऱ्या अर्थाने ताकद दिली, तरच ग्रामीण भागात शिवसेना टिकेल; अन्यथा पंचायत समिती व जिल्हा परिषदेला उमेदवार मिळणे मुश्कील होईल. त्याकरिता शिरूर लोकसभा मतदार संघाचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षाने ताकद द्यावी. आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीशी उभे राहू, असेही त्यांनी सांगितले.

shivsena meeting
‘संजय पवारांबरोबरच नंदूरबारच्या शिवसैनिकाचीही राज्यसभेसाठी चर्चा झाली होती’

अरुण गिरे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी आणलेल्या योजना शिवसैनिकांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवाव्यात. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात पारगाव-अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात येईल असे सांगितले.

shivsena meeting
'राज्यसभा पुरस्कृत उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना ‘हे’ सांगितलं होतं!'

या वेळी सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर, उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख अरुण गिरे, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, रविंद्र कंरजखेले , हनुमंत तागड, नारायण गाढवे, नरेंद्र भागवत, चंद्रकांत लोखंडे, महादेव कानसरकर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com