Shirur News : 'घोडगंगेच्या' राजकारणात नवा ट्विस्ट : विरोधी पॅनलचे उमेदवार अजितदादांच्या भेटीला?

Shirur News : मांडवगण गटातून मागील निवडणूकीत पक्षाच्या सात उमेदवारांना गाळले होते.
Ashok Pawar
Ashok PawarSarkarnama

शिरूर : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत उस-उत्पादक सभासदांनी अत्यंत विश्वासाने, राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलकडे कारखान्याचा कारभार सोपविल्याने कारखाना टिकविणे याबरोबरच वाढविणे यादृष्टीने अधिक प्रयत्न करणार असल्याचे, आमदार ॲड. अशोक पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. कारखान्याच्या विस्तारीकरणाला आडगेपणाने यापूर्वी विरोध झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Ashok Pawar
PCMC News : उद्योगनगरीत कामगारांचा आक्रोश : थेट आमदारांनाच इशारा!

घोडगंगाचा विस्तार आणि विकास हेच आगामी पाच वर्षांतील ध्येय असेल, असे स्पष्ट करून आमदार ॲड. पवार म्हणाले, ज्या काळात फार स्वस्तात कारखाना मोठा होत होता, त्यावेळी काही स्थानिक लोकांनी आडगेपणाची भूमिका घेऊन विस्तारीकरणाला विरोध केला. त्यामुळे त्या काळात कारखाना मोठा करता आला नाही.

ज्यावेळी कारखान्याने विस्तारीकरण व वीजनिर्मिती करण्याचे ठरविले त्याकाळात प्रकल्पातील वीज खरेदी करार करण्यास तत्कालीन राज्य सरकारने विलंब केला. त्यामुळे कारखान्यासमोरील अडचणी वाढून पुढे विस्तारीकरणासाठीचे पैसेही उचलता आले नाही. त्यामुळे विस्तारीकरण राहिले. परंतु भविष्यामध्ये कारखाना कसा चांगल्या दिशेने नेता येईल, शेतकऱ्यांना त्यातून कसे दोन पैसे अधिकचे देता येतील, ही भूमिका राहणार आहे. कामगारांचे पाच महिन्यांचे पगार थकलेत ते सुरळीत करण्याला प्राधान्य देऊन नियोजन केले जाईल.

विरोधकांनी निवडणुकीत केलेल्या टीका-टिपण्णीला आपण कामातून उत्तर देणार असल्याचे आमदार पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, निवडणूक प्रचार काळात विरोधकांनी शिवराळ भाषा वापरली. अंगावर धावून येण्यापर्यंत त्यांची मजल गेली. आताही ते आमचे डिपॉझिट जप्त झाले असते, असे म्हणतात. पण त्यांनी यापूर्वीच्या निवडणूकांच्या निकालातून काय धडा घ्यायचा याचा पाठ सामान्य उस उत्पादक सभासद मतदारांनी, त्यांना या निवडणूकीच्या निकालातून घालून दिला आहे. त्यातून त्यांनी आत्मपरिक्षण करावे. विरोधकांतील काहीजण पक्षांतराच्या भूमिकेत आहेत. अजितदादांना त्यासाठी ते भेटत आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर त्यांचे स्वागतच आहे. त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशाला आमचा विरोध नाही, परंतु त्यांनी नीटनेटके रहावे.

Ashok Pawar
PCMC News : उद्योगनगरीत कामगारांचा आक्रोश : थेट आमदारांनाच इशारा!

घोडगंगा कारखान्याच्या मागील एका निवडणूकीत पक्षाच्या सात उमेदवारांना मांडवगण गटातून गाळले होते. असले पाप आम्ही कधी केले नाही. यांच्या याच गुणामुळे ते केवळ सत्तर - ऐंशी मतांनी निवडून आले तर आमचा राखीव गटातील उमेदवार देखील दोन हजारांच्या फरकाने निवडून आला. त्यावरून सामान्य उस-उत्पादकांचे राष्ट्रवादीच्या पॅनेलला असलेले पाठबळ दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com