MNS Leader Join's Shivsena: मनसेला पुण्यात पुन्हा धक्का : शिरूरमधील नेत्याचा तडकाफडकी शिवसेनेत प्रवेश

शिरूर शहर व तालुका मनसेअंतर्गत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लाथाळ्या सुरू होत्या.
MNS Leader Join's Shivsena
MNS Leader Join's ShivsenaSarkarnama

शिरूर (जि. पुणे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूर शहराध्यक्ष अविनाश सुरेश घोगरे यांनी अचानकपणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केल्याने शिरूर मनसेला धक्का बसला आहे. आधीच विस्कळीत झालेली शिरूर शहर व तालुका मनसेतील बेदीली घोगरे यांच्या शिवसेना प्रवेशाने चव्हाट्यावर आली आहे. (Shirur city president of MNS Avinash Ghogare joins Shiv Sena)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते, जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर तसेच उपनेते व जिल्हा समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे झालेल्या आढावा बैठकीवेळी घोगरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

MNS Leader Join's Shivsena
Daund Crime News: दौंडच्या माजी नगराध्यक्षाच्या मुलाने सरबतमध्ये गुंगीचे औषध टाकून विवाहितेवर केला बलात्कार

अविनाश घोगरे हे गेल्या चार वर्षांपासून मनसेचे शिरूर शहर अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. विजेचा प्रश्न, शहरातील ओढ्यानाल्यांवर झालेले अतिक्रमण, कचरा डेपोची समस्या, हुडकोची घरे संबंधित नागरीकांच्या नावावर करण्याबरोबरच रस्त्यांवरील खड्डे यासह अनेक जनहितकारी आंदोलनातून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.

MNS Leader Join's Shivsena
सोलापुरात ठाकरेंना धक्का : माजी मंत्री दिलीप सोपलांचा शिवसेनेचे पद स्वीकारण्यास नकार

कोरोनाच्या काळात आलेली अधिकची वीजबीले कमी करावीत, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी महावितरणच्या शिरूर येथील कार्यालयात तोडफोड केली होती. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना दोन दिवस शिरूरच्या, तर १५ दिवस येरवड्याच्या जेलमध्ये काढावे लागले होते.

MNS Leader Join's Shivsena
Rebels Defeated the BJP: बंडखोरांनी केला भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ : पक्षाच्या १४ उमेदवारांचा घडविला पराभव!

शिरूर शहर व तालुका मनसेअंतर्गत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लाथाळ्या सुरू होत्या. त्यातून गटबाजी उफाळून आली होती. एकमेकांविरोधात समाजमाध्यमांवरून चिखलफेकही सुरू झाली होती. या परिस्थितीला कंटाळून मी मनसेचा त्याग करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केल्याचे अविनाश घोगरे यांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे एक सामान्य शिवसैनिक म्हणून काम करणार असून, शिरूर शहर व परिसरातील विविध प्रश्नांसंदर्भात आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in