Shivajirao Adhalrao : शिंदे गटात गेलेल्या शिवाजीराव आढळरावांचे राष्ट्रवादीकडून स्वागत

Shivajirao Adhalrao : निवडणुकीनंतर गावात रस्त्यांची कामेच झाली नसल्याने आढळराव यांच्या दौ-यावेळी त्यांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले.
Shivajirao Adhalrao Patil Latest News
Shivajirao Adhalrao Patil Latest Newssarkarnama

शिक्रापूर : शिंदे गटात (Shinde group) गेलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adhalrao) यांचे काल (शनिवारी) करंदी (ता.शिरूर) जंगी स्वागत करण्यात आले. करंदी येथे राष्ट्रवादीच्या सरपंच-उपसरपंचांसह सर्व पक्षीय पदाधिकारी आढळरावांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

गेल्या अडीच वर्षात गावात कुठलेही रस्ते झाले नसल्याची तक्रार करीत गावातील प्रलंबित रस्त्यांची यादीच यावेळी आढळरावांसमोर मांडली. तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात सरपंच सोनाली बंटी ढोकले यांनी दिलेल्या रस्त्याच्या यादीवर लवकरच कार्यवाही करण्याची ग्वाही यावेळी आढळराव यांनी दिली.

सन २०१५ मध्ये संसद आदर्शग्राम म्हणून तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव यांनी करंदी निवडली व गावात शाळा, मंदिरे, स्मशानभूमी, आरोग्य उपकेंद्र, रस्ते यांची सुमारे १० कोटींची कामे केली.

सन २०१९ च्या निवडणूकीनंतर गावात रस्त्यांची कामेच झाली नसल्याने आढळराव यांच्या दौ-यावेळी त्यांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले. सरपंच सोनाली बंटी ढोकले या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी ढोकले यांच्या पत्नी असून त्यांनी गावातील सर्व प्रलंबीत रस्त्यांची यादीच आपल्या भाषणात मांडत ही यादी आढळराव यांचेकडे सुपूर्द केली.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा कालवा सल्लागार समितीचे सदस्य राजाभाऊ ढोकले, उपसरपंच पांडूरंग ढोकले, ग्रामपंचायत सदस्या सुनिता ढोकले, रेखा खेडकर,नितीन ढोकले, राघू नप्ते, क्रांती युवा संघटनेचे विकास दरेकर यांनीही रस्त्यांची कामे तात्काळ होण्यासाठीचा आग्रह केला.

Shivajirao Adhalrao Patil Latest News
Love Jihad : नवा कायदा येणार ; अधिवेशनात मांडणार विधेयक : अनिल बोंडे

नवनियुक्त तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे व आंबेगावचे तालुकाप्रमुख अरुण गिरे यांचा विशेष सत्कार यावेळी माजी सरपंच चेतन दरेकर, शरदबापू ढोकले, खंडूभाऊ ढोकले, उद्योजक अविनाश साकोरे, पोपट नप्ते, बापू पंचमुख, बाबासाहेब ढोकले आदींनी केला.

कार्यक्रमाला बापूसाहेब मासळकर, बाबाजी झेंडे, बाबाजी कंद्रुप, किरण दरेकर, प्रविण झेंडे, सागर झेंडे, अनिल नप्ते,वैभव ढोकले, सचिव संतोष ढोकले, सुभाष कड, दादा वाघचौरे, सुभाष जगताप, गोपाशेठ दरेकर, दादापाटील दरेकर, निलेश नप्ते, माऊली नप्ते, गजानन ढोकले, चंद्रकांत नप्ते आदी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार

राजकारणाचा कुठलाच संबंध नसताना थेट लोकसभेत पाठविलेल्या खेड व आत्ताच्या शिरुर लोकसभा मतदार संघाचे उपकार मी मरेपर्यंत विसरणार नाही. सन २०१९ मध्ये हरलो तरीही दूस-या दिवसापासून मी लगेच मतदार संघात लोकांमध्ये फिरु लागलो. अन्यायग्रस्तांसाठी आणि ज्यांचे कुणीच ऐकत नाही त्यांचेसाठी २४ तास उपलब्ध राहत असल्याने अन्यायग्रस्त करंदीकरांच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचेही आढळराव यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in