शेलारांनी केली दानवेंना ही विनंती  - Shelar made this request to Danve | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

शेलारांनी केली दानवेंना ही विनंती 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 जुलै 2021

कोकणासाठी आणखी विशेष रेल्वेगाड्यांची गरज 

पुणे : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या 72 विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार (Ashiash Shelar) यांनी केली आहे. रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर रावसाहेब दानवे (Ravsaheb Danave) यांनी पुण्याला भेट दिली या भेटीत शेलार यांनीया मागणीचे निवेदन दानवे यांना दिले.(Shelar made this request to Danve) 

कोकणात गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या कोकणातील मूळ गावी जातात. यावर्षी कोकण रेल्वेने 72 अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आणि बुकिंग सुरु होताच त्यांचे बुकिंग पुर्ण क्षमतेने होऊन बरेचजण अद्याप प्रतिक्षा यादीतच आहेत. दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून 2019 ला कोकण रेल्वेवर 210 फेऱ्या व रेल्वे गाड्यांना 647 अतिरिक्त डबे जोडले  होते. त्यावेळी तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग साठी 11 टपाल खात्यात, 17 रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि 16 ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या.

त्यामुळे याही वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा व अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत ही विनंती आमदार शेलार यांनी रेल्वे राज्य मंत्री दानवे यांना केली. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर आदी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या काळात मुबंई परिसरातून रेल्वे व्यतिरिक्त एसटी बस व विविध खासगी वाहनांमधून कोकणातील मूळ गावी जाणाऱ्या कोकणवासियांचे प्रमाण मोठे असते तरीही गेल्या काही वर्षात रेल्वची मागणी वाढत आहे.
Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख