Kasaba By-Election : मतदानासाठी तिने लंडनहून गाठलं पुणे; म्हणाली...

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज (26 फेब्रुवारी) मतदान होत आहे.
Kasaba By-Election : मतदानासाठी तिने लंडनहून गाठलं पुणे; म्हणाली...

Kasaba By- Elelction News : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज (26 फेब्रुवारी) मतदान होत आहे. भाजप आणि महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची झाली आहे. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असताना मतदानाची टक्केवारी कमी झाल्याची चर्चा आहे. असे असतानाच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक मुलगी थेट लंडनहून पुण्यात आली आहे. अमृता देवकर असे या तरुणीचे नाव आहे.

मतदान हा आपला हक्क आणि अधिकारआहे. सगळ्यांनी मतदान केले पाहिजे, या विचाराने तरुणीने पुणे गाठल्यानंतर तरूणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशी भूमिका पुढे घेऊन जात अमृताने थेट लंडनहून थेट पुणे गाठलं आहे. १२ तासांहून अधिक प्रवास करून आलेल्या अमृताने पुण्यात येताच थेट मतदान केंद्र गाठलं आणि मतदानाचा हक्क बजावला.

Kasaba By-Election : मतदानासाठी तिने लंडनहून गाठलं पुणे; म्हणाली...
Kasba Peth, Chinchwad Bypolls 2023 : पहिल्या चार तासात चिंचवडमध्ये 10.45 टक्के तर कसब्यामध्ये...

अमृताने सांगितले की, मध्यरात्री दिड वाजता मी मुंबईत पोहचले. ३ वाजता मुंबईतून पुण्यात यायला निघाले. आठ वाजेपर्यंत पुण्यात पोहचले. त्यानंतर थोडा आराम केला आणि मतदान करण्यासाठी आले. मला मतदानाचा हक्क सोडायचा नव्हता. मतदानाचा हक्क बजावायचा, ही पहिली भावना होती.

कसब्यात पाण्याचा प्रश्न होता. आता ते सुटू लागले आहेत. मात्र अजूनही नागरीकांचे बरेच प्रश्न, समस्या आहेत. ते आता लोकप्रतिनिधींनी ते सोडवण्याचे प्रयत्न करायचे आहेत. कसब्याचा विकास आणखी वेगाने व्हायला हवा, अशी इच्छाही तिने यावेळी व्यक्त केली.

मी पुण्यात येत आहे तर मी मतदानाचा हक्क बजावावा, अशी घरच्यांची इच्छा होती. चार वर्षापूहीर्वीही मी मतदान करण्यासाठी पुण्यात आले होते. तरुणपिढी देशाच्या विकासाला दिशा देत असते. त्यामुळे प्रत्येक तरुणाने मतदान करायला हवे. घरात बसून अडचणी सुटत नसतात त्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो. तरुणांनी ही पुढाकार घ्यायला हवा, असे अमृताने यावेळी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com