संघटनेतून काढून टाकण्याचा आधिकार शशिकांत पवारांना नाही : राजेंद्र कोंढरे

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे अध्यक्षपदाचे सर्व अधिकार विशेष सर्वसाधारण सभेने गोठविले आहेत.
Maratha Mahasangh
Maratha MahasanghSarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे अध्यक्षपदाचे सर्व अधिकार विशेष सर्वसाधारण सभेने गोठविले आहेत.त्यामुळे त्यांना लोकशाही पद्धतीने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना बरखास्त करण्याचा अधिकार घटनेनुसार नाही. महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेने पवार यांचे अध्यक्षपदाचे गोठवलेले अधिकार एकमताने महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांना देण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मराठा महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत तीन महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. त्यामध्ये शशिकांत पवार यांनी नियमबाह्य पद्धतीने अधिकाराचा दुरुपयोग करून लाभलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. राज्यव्यापी मराठा संपर्क अभियानाची सुरवात करणे, युवक, विद्यार्थी, उद्योजक, संघटना वाढविण्यासाठी निर्णय घेणे, राज्यातील जिल्हा आणि तालुका पातळीवर लोकशाही पद्धतीने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नोंद घेऊन त्यांना मान्यता देण्यात आली.

Maratha Mahasangh
पुण्यातील पाच आमदारांना तिकीट नाही मिळणार!

अखिल भारतीय मराठा महासंघ मध्यवर्ती कार्यालयाच्या मुंबई येथील इमारत पुनर्विकास गैरव्यवहाराबाबत लेखी माहिती देऊन सभासदांच्या उपस्थितीत संस्थेच्या आर्थिक व्यवहार आणि नुकसानीची नोंद घेऊन पवार यांचे अध्यक्षपदाचे सर्व अधिकारी गोठविले आहेत. त्यामुळे पवार यांनी कोंढरे यांच्यासंबंधी काढलेल्या पत्रकाला कायदेशीर अर्थ नाही, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.

महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांनी पवार यांनी केलेला बेकायदा करार आणि इतर कागदपत्रांची मागणी त्यांच्याकडे केली असता, त्यांनी जाणूनबुजून कोणतीही माहिती पदाधिकाऱ्यांना दिलेली नाही. त्यांनी पदाचा गैरवापर करून केलेले दस्तावेज योग्य आहेत, हे एखाद्या वास्तुविशारद किंवा वकिलांकडून जाहीर करावे, अशी मागणी कोंढरे यांनी केली.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in