आघाडी सरकारमध्ये मान-सन्मान नाही ; शिवसेनेच्या माजी आमदाराकडून घरचा आहेर

''जी कामे पूर्वीच्या आमदारांनी मंजूर केली आहेत. ती आता पूर्ण झाली आहेत. त्यांच्या उद्धघाटनासाठी माजी आमदारांना बोलविलं पाहिजे
Sharad Sonawane, Atul Benke

Sharad Sonawane, Atul Benke

sarkarnama

पुणे : विकासकामाच्या श्रेयवादावरुन महाविकास आघाडीतील आजी-माजी आमदारांमध्ये आज शाब्दीक चकमक उडाली. शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonawane) व राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांच्यात विकासकामाच्या उद्घाटनावरुन''तु तु में में.'झाले. त्यानंतर माजी आमदार शरद सोनवणे यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधला.

शरद सोनवणे म्हणाले, ''मी आमदार असताना अनेक कामांना मंजुरी मिळाली होती. त्यानंतर २०१९ ला आचारसंहिता लागली. त्यामुळे काही कामे त्याच्यामध्ये अडकली. काही कामांना स्थगिती मिळाली. अडकलेली कामे पुढे सुरु झाल्यानंतर उद्धव ठाकरेचं सरकार स्थापन झाले. त्यानंतर कोवीड आला. सगळ्या कामांना स्थगिती आली. पण मंजूर झालेली कामे रद्द झाली नाहीत.ती कामे आता चालू झालेली आहेत,''

''जी कामे पूर्वीच्या आमदारांनी मंजूर केली आहेत. ती आता पूर्ण झाली आहेत. त्यांच्या उद्धघाटनासाठी माजी आमदारांना बोलविलं पाहिजे. विद्यमान आमदारांनी माजी आमदारांना विश्वासात घेतले पाहिजे. आम्ही जी कामे आणली त्या कामाच्या उद्घाटनला फेटे लावून त्यांनी बॅनर लावले अन् आम्हीच ही कामे आणली, असे सांगत आहेत. स्थगिती म्हणजे कामे रद्द झालेली नाही, ही कामे थांबविली आहेत. ती रद्द झालेली नाहीत. त्या कामांच्या उद्धघाटना आम्हाला न बोलविल्यामुळे आमचा अपमान झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला,'' असे सोनवणे म्हणाले.

''महाविकास आघाडीमध्ये आम्हाला तसा मान-सन्मान मिळत नाही. ही शोकांतिका आहे. शिवसेनेच्या कामाची पद्धत ठरलेली आहे. संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे. पण यांचा असा अर्थ नाही, राष्ट्रवादीनं वेळोवेळी अपमानीत करावं, अडचणीत आणावं, आम्हाला संघर्ष करावा लागत आहे, ही आमच्यासाठी दुदैवाची बाब आहे. त्यामुळे हा गोंधळ झाला. विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी मान्य केलं की यापुढे माजी आमदारांनी मंजूर केलेल्या कामाच्या उद्घाटनला त्यांना बोलवू,'' असे सोनवणे म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Sharad Sonawane, Atul Benke</p></div>
शिवसेना-भाजप म्हणजे दोन भावांतील भांडण ; चंद्रकांतदादांनी दिले युतीचे संकेत

जुन्नर तालुक्यात रस्त्याच्या भुमीपुजन कार्यक्रमात शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonawane) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांच्यामध्ये भर कार्यक्रमांत शाब्दीक चकमक उडाली. सोनवणे- बेनके यांच्यात बाचाबाची झाली.

जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर २ गावात रस्त्याच्या भुमीपुजन कार्यक्रमात हा धक्कादायक प्रकार घडला. शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनकेंमध्ये भर कार्यक्रमांत शाब्दीक चकमक उडाली. एकमेंकांना ''तु तु में में.'' केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यामुळे गावकऱ्यांची कोंडी झाली. ''आपले कर्तृत्व किती आपण बोलतो किती,'' असा टोमणा शरद सोनवणे यांनी अतुल बेनके यांना लगावला. यावर बेनके संतप्त झाले. गावकऱ्यांनी मध्यस्थी करुन हा वाद संपविला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com