Sharad Pawar News : फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर शरद पवारांची नाराजी

स्पर्धेच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा सत्कार केला.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Sharad Pawar News : नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. पण या स्पर्धेत पैलवान सिकंदर शेखवर अन्याय झाल्याचा आरोप सिकंदरच्या आईवडिलांनी केला. त्यामुळे या स्पर्धेला अन्यायाच्या चर्चेच्या वादाची किनार लागली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी मैदानातील एका गोष्टीने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र केसरीच्या मैदानात उपमुख्यमंत्री हे सुद्धा तिथे होते. यावेळी फडणवीसांनी ‘सनातन धर्म की जय’ अशी घोषणा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निशाणा साधला आहे.

स्पर्धेच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा सत्कार केला. मोदीबागेत शिवराज राक्षे याने खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.

Sharad Pawar
Accident news : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपात्कालीन लॅंडिग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानातील समारोपाच्या भाषणात ‘सनातन धर्म की जय’ अशी घोषणा दिली, असे विचारले असता ते शरद पवार म्हणाले की, ''महाराष्ट्र केसरीच्या मैदानात फडणवीस यांच्याकडून पैलवानांच्या मानधन वाढीची घोषणा झाली त्याचं स्वागतच आहे पण तुम्ही म्हणता तसं कुणाची जय वैगरेची घोषणा झाली असेल तर ते अयोग्य आहे.''

याचवेळी त्यांनी त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. ''चंद्रकांत पाटील हे फार शक्तिमान गृहस्थ आहे. पण त्यांचं घर कोल्हापूरला आणि ते कोथरूडमधून निवडणूक लढले. त्यांना त्यांचं गाव सोडून पुण्यात, कोथरूडमध्ये यावं लागलं. पण त्यांचं कोथरूडसाठी काय योगदान आहे? त्यांच्यावर काय भाष्य करावं? असा टोला लगावत शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com