शरद पवार करणार शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी, ईद सोहळ्यालाही राहणार उपस्थित

सोहळ्याला हिंदू, मुस्लिमच नाही, तर ख्रिश्चन, शीख अशा सर्वच धर्मगुरुंना आमंत्रित करण्यात आले आहे.
शरद पवार करणार शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी, ईद सोहळ्यालाही राहणार उपस्थित
Sharad Pawar Latest NewsSarkarnama

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आपल्या भाषणात फक्त शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतात. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा उल्लेख करीत नाहीत, त्यांना वंदन करीत नाहीत, अशी टीका मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच केली होती. त्याला सणसणीत प्रत्यत्तर पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) बुधवारी (ता.११ मे) देणार आहे. पवारांच्या हस्ते ते भोसरी येथील शिवसृष्टीतील शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करणार आहेत. (Sharad Pawar Latest News)

Sharad Pawar Latest News
अजित पवारांचा संजय राऊतांना टोला; शिरूरमधून डाॅ. कोल्हेच राष्ट्रवादीचे उमेदवार...

एवढेच नाही, तर राज यांच्यामार्फत सध्या भोंगा आणि हनुमान चालिसाव्दारे झालेल्या धुव्रीकरणाच्या राजकारणाला सुद्धा राष्ट्रवादीने चपराक देणार आहे. बुधवारी आपल्या सर्वोच्च नेत्याच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रीय एकात्मता स्नेहमेळावा तथा जश्ने ईद-ए-मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज (ता.९ मे) ही माहिती दिली. या सोहळ्याला हिंदू, मुस्लिमच नाही, तर ख्रिश्चन, शीख अशा सर्वच धर्मगुरुंना आमंत्रित करण्यात आले आहे. शिरूरचे पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहरातील (पिंपरी) आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे आणि सर्व आजी, माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Sharad Pawar Latest News
पालकमंत्री परबांना हटवा; शिवसेना पदाधिकारी आक्रमक

जश्न-ए ईद मिलनच्या आयोजनामागील हेतू काय व त्याला सर्वच धर्माच्या धर्मगुरुंना का बोलावण्यात आले या प्रश्नाला सद्यस्थिती असे उत्तर गव्हाणेंनी दिले. ते देताना त्यांनी भाजपसह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. राजकीय अस्तित्व संपत आलेल्या पक्षाला पुढे करून केंद्र सरकार हे जातीय तेढ निर्माण करीत असल्याचा हल्लाबोल त्यांनी भाजपसह मनसेवरही केला. प्रक्षोक्षक भाषणे करून हिंदू-मुस्लिमांत दरी निर्माण करण्याचे काम सध्या सुरु असून ती मिटविण्याचा एक प्रयत्न म्हणून हा सोहळा आय़ोजित केल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रातील भाजप सरकार हे सत्तेचा दुरुपयोग करून खालच्या स्तराचे राजकारण राजकीय स्वार्थासाठी करीत आहे. पण, पुरोगामी महाराष्ट्र या चुकीच्या गोष्टीला कदापी खतपाणी घालणार नाही. धर्म व जातीच्या नावाखाली हे राजकारण करणाऱ्यांना जनता आगामी काळात त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Sharad Pawar Latest News
IPS अधिकारी कृष्णप्रकाश यांची संपत्ती किती? ही घ्या यादी...

प्रशासक लागलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्याही निवडणुका कधी होतील, याविषयी सध्या संभ्रम आहे. मात्र, ती कधीही होऊ द्या, राष्ट्रवादी तयारीत आहेत, निवडणुकीचे सर्व प्लॅनिंग झाले आहे. त्यासाठी शहराची नवी कार्यकारिणी पक्षाचे नेते अजित पवार हे या आठवड्यात जाहीर करतील, असे गव्हाणे यांनी सांगितले. माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी महापौर मंगला कदम, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, शमीम पठाण, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शहर कार्याध्यक्ष फजल शेख, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शाम लांडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.