बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी शरद पवार येणार होते; पण...

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन बैलगाडा शर्यती न भरवण्याचा निर्णय प्रशासन व स्थानिक देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी घेतला आहे
sharad pawar-bullock cart race
sharad pawar-bullock cart racesarkarnama

मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील थापालिंग येथील खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त सोमवारी (ता. १७ जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतींसाठी (bullock cart race) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना निमंत्रित केले होते. त्यांनी शर्यतीसाठी येण्याचे मान्यही केले होते. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारच्या नियमावलीच्या बाहेर कोणालाही जाता येणार नाही. त्यामुळे आपल्या भावनांना आवर घालून कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन बैलगाडा शर्यती न भरवण्याचा निर्णय प्रशासनाने व स्थानिक देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी घेतला आहे,”असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितले. (Sharad Pawar was to come for bullock cart races in Ambegaon : Dilip Walse Patil)

मंचर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. १६ जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत वळसे पाटील बोलत होते. या वेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, थापालिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील उपस्थित होते.

sharad pawar-bullock cart race
फटेकडून फसवणुकीची सुरुवात बारावीपासूनच... आई म्हणून 'मेस'मधील महिलेला केले उभे!

बैलगाडा शर्यतीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीस प्रशासनाने ऐनवेळी परवानगी नाकारली होती. त्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून प्रशासनासह महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या तालुक्यातील थापलिंग येथील शर्यत रद्द करण्यात आली आहे.

sharad pawar-bullock cart race
बार्शीकरांना लुटणाऱ्या फटेच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे मोठे पाऊल!

यासंदर्भात दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर बैलगाडा शर्यती सुरु व्हाव्यात. असा प्रयत्न होता. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे राज्य व जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यांचे पालन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.”

sharad pawar-bullock cart race
राजन पाटलांच्या शब्दाला आजही मान; मग कामे का होत नाहीत : उमेश पाटलांचा सवाल

कोरोनाच्या संदर्भात पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यातून मिळणाऱ्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम ही कोरोनावरील उपचारासाठी पोलिसांना आवश्यक उपाय योजना राबवता याव्यात, यासाठी उपलब्ध करून देता येतील का, याची चाचपणी सुरु आहे, असेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com