माळेगाव कारखान्यात तब्बल ११ वर्षानंतर शरद पवार आले

माळेगाव साखर कारखान्याने (Malegaon Sugar Factory) १२ लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण करत १५ लाख टनाचे लक्ष ठेवल्याबद्दल पवार यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama

माळेगाव : देशात वीज आणि इंधनाची पुरेसी गरज विचारात घेता वीज आणि इथेनॅाल निर्मितीचे प्रकल्प सर्वत्र होत आहेत. अगदी जेथे ऊस पिकत नाही, अशा ठिकाणीही म्हणजे आंध्रप्रदेश (Andhra Pradesh), तेलंगणा आदी राज्यात तांदूळ, मक्यापासून इथेनॅालनिर्मिती होत आहे. त्यामुळे आगामी काळातील या धंद्यातील स्पर्धा विचारात घेता 'माळेगाव'सह सर्वच साखर कारखान्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. माळेगावने (Malegaon Sugar Factory) १२ लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण करत १५ लाख टनाचे लक्ष ठेवल्याबद्दल पवार यांनी यावेळी आर्वजून प्रशासनाचे कौतुक केले.

राज्यात अतिरिक्त ऊस गाळपाचे आवाहन, साखर विक्री, इथेनॅाल व विजनिर्मीती, साखर साठ्याचे नियोजन आणि एकरी ऊस उत्पादन घटत चालल्याची कारणे विचारात घेऊन पवार यांनी आज (ता. २१) माळेगाव कारखान्याला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) तालुकाध्यक्ष संभाजी होळकर उपस्थित होते. अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्शीलाल आटोळे, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी पवार यांचे स्वागत केले. दरम्यान, आपल्याकडील कारखादारांना इथेनॅालसाठी जवळचे ऑइल डेपो मिळत नाहीत. इतर राज्यात पुरवठा करायचा असल्यास वाहतूक खर्च परवडत नाही.

Sharad Pawar
जनतेच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या दरेकरांची आमदारकी काढून घ्या!

परिणामी केंद्र सरकारच्या अपेक्षेनुसार इथेनॅाल पेट्रोलमध्ये वापरले जात नाही. त्यासाठी देशात ऊस उत्पादन न होणाऱ्या भागामध्ये इथेनॅाल पुरवठा करण्याचे काम कारखान्यांऐवजी ऑइल कंपन्यांनी केल्यास सर्व ठिकाणी इथेनॅाल पुरवठा होऊ शकतो. ही बाब संचालक अनिल तावरे, योगेश जगताप यांनी पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. तोच धागा पकडत पवार म्हणाले, की इथेनॅाल निर्मिती करण्यासाठी सर्वत्र प्रकल्प उभारले जात आहे. ऊस, तांदूळ, मक्यापासून इथेनॅाल निर्माणती केली जात आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी यापुढे सर्वच कारखान्यांना उत्पादन खर्च कमी करावा लागणार आहे. ११ वर्षांपुर्वी मी या कारखान्यावर को-जनरेशच्या उद्घाटनाला आलो होतो, त्यावेळची आणि आत्ताची स्थिती फारशी बदललेली नाही, असेही पवार म्हणाले.

खरेतर माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात प्रशस्त रस्ते, साखरेसाठी गोदामे आणि एकरी उत्पादन वाढण्यासाठी सुपीक जमिन असल्यामुळे सुधारण्यासाठी मोठी गुंतवणूक केल्याशिवाय पर्याय नसल्याचे पवार यांनी सांगितले. माळेगावने ऊस गळीतात १२ लाखाचा टप्पा ओलांडला आणि १५ लाखांपर्यंत गळीत करण्याचा मानस ठेवला ही गोष्ट कौतुकास्पद आहे. संचालक नितीन सातव, तानाजी देवकाते, मदनराव देवकाते यांनी एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ड्रिपचे प्रकल्प उभारणी, शेततळी, सबसरफेज ड्रेनेज होण्याकामी शासनस्तराव मदत होण्याची आपेक्षा व्यक्त केली.

राजेंद्र ढवाण, सुरेश खलाटे यांनी ऊस हार्वेस्टींगमधील समस्या बोलून दाखविल्या. यावेळी एमडी राजेंद्र जगताप यांनी दोन वर्षातील गळीत हंगामाचा आढावा मांडला. यावेळी संचालक केशवराव जगताप, गुलाबराव देवकाते, तानाजी कोकरे, संगिता कोकरे, स्वप्नील जगताप, सागर जाधव, मंगेश जगताप, प्रताप आटोळे, संजय काटे, प्रमोद खलाटे, तानाजी पोंदकुले उपस्थित होते.

Sharad Pawar
थेट अजितदादांना आव्हान देणारी ठोंबरे-म्हस्केंची जोडी तब्बल ४० वर्षांनंतर फुटली!

पवारसाहेबांच्या प्रश्नांची उत्तरे...

सोमेश्वरच्या तुलनेत माळेगावची अर्थिक स्थिती कशी आहे, असे विचारले असता अध्यक्ष तावरे यांनी माळेगावचे विस्तारिकरण झाल्याने १९० कोटींचे कर्ज दोन वर्षांपुर्वी कारखान्यावर होते. ते आता ११० कोटींपर्यंत खाली आणले आहे. इथेनॅाल व वीज निर्मितीला चालना देता का असे पवारांनी विचारताच ऊस गळीताबरोबर डिस्टिलरी व कोजनरेशन प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालविण्यात यंदा यश आल्याचे मदनराव देवकाते यांनी सांगितले. साखरेसाठी वेअर हॅाऊस बांधल्याचे दिसत नसल्याचा प्रश्न येताच प्रशासनाने हे काम प्रस्तावित असल्याचे सांगितले. नीरा नदीकाठच्या क्षारपड जमिनींचा विचार केला की नाही. यावर मात्र साहेब आपणच आम्हाला मदत करावी, अशी विनंती संचालक मंडळाने केली. पवारांनी लागलीच व्हिएसआय संस्थेतील वरिष्ठांशी संपर्क करीत संबंधितांना माळेगावच्या कार्यक्षेत्रातील माती व पाण्याचा अहवाल देण्याच्या सुचना केल्या. तसेच त्यांनी यंत्रसमामुग्रीतील आधुनिकतेबरोबर अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासाची व्यवस्था नव्याने करण्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com