शरद पवारांनी राष्ट्रवादीची 'टुकडे टुकडे गँग' आवरावी : चंद्रकांत पाटलांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत टिंगल केल्यामुळे पुरोहितांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
शरद पवारांनी राष्ट्रवादीची 'टुकडे टुकडे गँग' आवरावी : चंद्रकांत पाटलांची मागणी
Chandrakant PatilSarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जाहीर सभेत टिंगल केल्यामुळे पुरोहितांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. समाजातील एकेका घटकाला टार्गेट करून आणि विविध समाज घटकांमध्ये विसंवाद निर्माण करत समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) आवरावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. (Sharad Pawar should cover NCP's Tukde Tukde gangs : Chandrakant Patil)

आमदार मिटकरी यांनी इस्लामपूरमधील सभेत काही मंत्र म्हटले होते. त्यावरून राज्यातील ब्राम्हण महासंघाकडून मिटकरी यांचा निषेध करण्यात येत आहे. त्यासंंदर्भात बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची इतर धर्माच्या धर्मगुरुंची टिंगल करायची हिंमत होत नाही.

 Chandrakant Patil
सोलापूरचे खासदार संसदेत कधी भेटतच नाहीत : सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

मिटकरी हे पुरोहितांची टिंगल करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्या पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे हे हसून त्याला दाद देत होते. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला एखाद्या समाज घटकाला असे लक्ष्य करणे शोभत नाही. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचा पुरोगामीपणा केवळ सांगण्यापुरताच आहे. या पक्षाच्या नेत्यांना केवळ विविध समाजघटकांमध्ये भांडणे लावून समाजाचे तुकडे करण्यात रस आहे, असा आरोपही आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.

 Chandrakant Patil
मिटकरींचे मंत्रोच्चारण वादात; पुण्यात ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीमध्ये तुफान राडा

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते पुरोहितांची टिंगल करत असले तरी त्यांना अन्य कोणत्या समाज घटकाबद्दलही आस्था नाही. महाराष्ट्रात १९९९ ते २०१४ अशी १५ वर्षे सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही आणि २०१९ मध्ये मतदारांचा विश्वासघात करून सत्ता मिळविल्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे आरक्षण घालविले. राष्ट्रवादी सहभागी असलेल्या आघाडीच्या बेफिकीरीमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. पुरोगामीत्वाचा आव आणायचा आणि प्रत्यक्षात विविध सामाजिक वर्गातील दुर्बल घटकांना लक्ष्य करून आपली मग्रुरी दाखवायची, ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पद्धती ताज्या घटनेत दिसली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.