हे अजितदादांचे काम नाही, ते माझे काम आहे : शरद पवारांची गुगली!

पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात येत्या १५ दिवसांत बैठक होणार आहे.
Sharad Pawar-Ajit Pawar
Sharad Pawar-Ajit PawarSarkarnama

पुणे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या इमारतीच्या पाहणीवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात येत्या १५ दिवसांत बैठक होणार आहे. त्यात हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच ‘हे अजितदादांचे (Ajit Pawar) काम नाही, तर माझे काम आहे,’ अशी गुगलीही त्यांनी टाकली.

राष्ट्रवादीचे आध्यक्ष पवार म्हणाले, ‘‘नियोजित आंतरराष्ट्रीय विमान तळासंदर्भात जागा निश्चित झाली. पण, संरक्षण खात्याने त्याला हरकत घेतली. त्यामुळे विमानतळाचा प्रश्न रेंगाळला आहे. पण येत्या पंधरा दिवसात मी स्वतः, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी मिळून संरक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहोत,''

Sharad Pawar-Ajit Pawar
पवार-ठाकरेंचे आभार मानत सतेज पाटलांनी व्यक्त केला हा विश्वास!

‘‘संरक्षण विभागाची विमाने रोज सकाळी सरावासाठी या भागातून जात असतात. त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे, हे समजून घ्यावे लागेल. त्यानंतरच विमानतळाबाबतचा प्रश्न मार्गी लागेल आणि हे काम अजितदादांचे नाही, तर हे काम माझे आहे,’’ असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar-Ajit Pawar
बिबट सफारीसाठी मी सर्वस्व पणाला लावलंय : आमदार अतुल बेनकेंनी ठणकावले

बारामती, दौंड व पुरंदर तालुक्याच्या लगतच्या गावांसाठी सुपे हे मध्यवर्ती बाजार पेठेचे गाव असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. गावात विद्या प्रतिष्ठानचे मोठे शैक्षणिक संकुल उभारले जात आहे. त्या बरोबरच उपजिल्हा रूग्णालय, मोठी बाजारपेठ होऊ घातली आहे.

Sharad Pawar-Ajit Pawar
राजेश क्षीरसागरांनी वाढवले सतेज पाटलांचे टेन्शन : फोनही घेतला नाही

पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नेमके कोठे होणार हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे. विमानतळ चाकणला होणार का पुरंदर तालुक्यात होणार याबाबत जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा चालू आहे. याबाबत पवार यांनी येत्या पंधरवड्यात हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सूतोवाच केले. त्यामुळे या होणाऱ्या बैठकीकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com